FDA Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कडक बंदीच्या आदेशाला स्थगिती, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Tukaram Mundhe, loose edible oil ban : सुट्या खाद्यतेल विक्रीवरील कठोर कारवाईला महाराष्ट्र सरकारने एक वर्षाची स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना संक्रमण कालावधी देत FDA आणि व्यापारी प्रतिनिधींच्या संयुक्त समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
Tukaram Mundhe, loose edible oil ban
Tukaram Mundhe, loose edible oil banSaam TV
Published On

Tukaram Mundhe loose edible oil ban Maharashtra : महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ रोखण्यासाठी सुट्या खाद्यतेलाच्या (Loose Edible Oil) विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा इशारा दिला होता. पण या निर्णयामुळे राज्यभरातील लहान-मोठे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठी चिंतेची लाट पसरली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसाय पद्धतीत आवश्यक ते बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी (Transition Period) देण्याचे जाहीर केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या कठोर अंमलबजावणीच्या भूमिकेनंतर निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आता राज्य सरकार, एफडीए (FDA) आणि व्यापारी प्रतिनिधींची एक संयुक्त समिती स्थापन करणार आहे. या काळात व्यापाऱ्यांवर थेट दंडात्मक किंवा कठोर कारवाई न करता, त्यांना नवीन नियमांनुसार पॅकेजिंग स्वीकारण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन, मदत आणि अनुदान (सबसिडी) उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tukaram Mundhe, loose edible oil ban
राज्यातील २ कोटींहून अधिक मतदारांची नावे कट; यादीत तुमचे नाव आहे की नाही? मिनिटांत असे तपासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या तेलाच्या विक्रीवरील कारवाई एक वर्षासाठी स्थगित दिली जाईल असे मंगळवारी स्पष्ट केले. खाद्यतेल व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी उपाययोजना आणि मार्गदर्शन सुचवण्यासाठी एफडीए (FDA) आणि व्यापारी प्रतिनिधींची एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. एक समिती पारंपरिक व्यापाऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करून कायद्यानुसार बदल सुचवेल, तर दुसरी समिती आवश्यक सुविधा निर्माण करेल. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला एका महिन्यात सादर केला जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. या बैठकीला एफडीए प्रमुख तुकाराम मुंडे उपस्थित होते.

Tukaram Mundhe, loose edible oil ban
Raigad politics : खासदार सुनील तटकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का; सख्खे व्याही शिंदेंच्या शिवसेनेत

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीच्या अंमलबजावणीबाबत 'मध्यम मार्ग' काढण्याचे आवाहन केले होते. तसेच एसओपी (SOPs) लागू केल्या जातील अशी घोषणा केली होती. दुसऱ्या दिवशी एफडीएने (FDA) ही बंदी वाटाघाटीयोग्य नसल्याचे म्हटले होते. पण नंतर ते विधान मागे घेतले. राज्यात २,१०३ परवानाधारक खाद्यतेल व्यापारी आहेत. त्यापैकी ३७० जणांकडे तेलाची पुनर्रपॅकेजिंग करून विक्री करण्याचा परवाना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com