Hrithik Roshan : हृतिक रोशनच्या क्रिश ४ चित्रपटाची प्रतिक्षा संपली; समोर आलं नवीन अपडेट

हृतिक रोशन एकापेक्षा एक 'अॅक्शन थ्रिलर' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकेकाळी सुपरस्टार हृतिकच्या क्रिशने प्रेक्षकांना प्रंचड वेड लावले होते. त्यानंतर चित्रपटाचे ३ भाग प्रदर्शित झाले.
hrithik roshan
hrithik roshan saam tv
Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे. हृतिक रोशन एकापेक्षा एक 'अॅक्शन थ्रिलर' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकेकाळी सुपरस्टार हृतिकच्या क्रिशने प्रेक्षकांना प्रंचड वेड लावले होते. त्यानंतर चित्रपटाचे ३ भाग प्रदर्शित झाले. या तिन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. चित्रपटातील अॅक्शन सीन्सना प्रेक्षकांनी चांगलीच पंसती दिली होती. गेल्या वर्षी जानेवारीत हृतिकने क्रिश-४ ची घोषणा केली होती. आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाबाबत नवीन अपडेट समोर आलं आहे.

hrithik roshan
Bhau Kadam |भाऊ कदम पुन्हा एकदा खळखळून हसवायला सज्ज; 'या' चित्रपटात दिसणार

हृतिक रोशनच्या क्रिश ४ चित्रपटाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. क्रिश ४ या चित्रपटावर काम सुरू झालं असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, क्रिश ४ या चित्रपटाच्या कथेमागचे संदर्भ घेऊनच पुढे सुरु होईल, जिथे क्रिश ३ ची कथा संपली होती, तिथूनच क्रिश ४ या भागाची नवीन कथा सुरू होईल. चित्रपटात नवीन पात्र असतील. इतकेच नाही तर चित्रपटाची कथा आधीपेक्षा रोमांचक ट्विस्टसह पूर्णपणे वेगळी असेल.

hrithik roshan
चर्चा तर होणारच! बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात

क्रिश ४ मध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्सही पाहायला मिळणार आहेत. दरम्यान प्रसिध्द दिग्दर्शक राकेश रोशन या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत. क्रिश ४ या चित्रपटात ह्रतिक रोशन किमान एक गाणे स्वत:च्या आवाजात गाणार असल्याच बोलले जात आहे.

बॅालिवूडचे सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या क्रिशने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यानंतर चित्रपटाचे तिन्ही भाग सुपरहिट ठरले आहेत. आता 'क्रिश'चा ४ प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. हृतिक रोशन लवकरच 'विक्रम वेधा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.