Rain Update : मुंबई, उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; ठाणे, नागपुरात सरीवर सरी, हवामान खात्याचा अंदाज काय?, VIDEO

Mumbai Rain Update News : मुंबई, ठाणे आणि नागपुरात पावसानं हजेरी लावली. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस येलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai Rain Update | मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
Mumbai Rain Update | मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. SAAM TV
Published On

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असलेल्या मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. ठाणे आणि नागपूरमध्ये सरी कोसळत आहेत. हवामान विभागानंही पुढील तीन ते चार दिवसांसाठी मुंबईत येलो अॅलर्ट दिला आहे.

मुंबई आणि उपनगरांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. पश्चिम उपनगरांमध्ये काही वेळापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आदी परिसरांत धो धो बरसत आहे. सकाळपासून आभाळ भरून आले होते. त्यामुळं पाऊस कोसळेल असा अंदाज होताच. अखेर काही वेळानं बरसण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain Update | मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील २८ मंडळात अतिवृष्टी; ३९ दिवसात पावसाचे २६ बळी

ठाण्यात पाऊस आला मोठा!

मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यावरही सकाळपासूनच ढग जमा झाले होते. अखेर काही वेळानं शहरात पावसानं हजेरी लावली. सरी कोसळू लागल्यानंतर शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.

नागपुरात सरीवर सरी...

नागपूर शहरातही पावसानं हजेरी लावली. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागानं पुढील तीन दिवस येलो अॅलर्ट दिला आहे. विदर्भात भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी ठिकाणी पुढील दोन तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai Rain Update | मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

हवामान खात्याचा इशारा

या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. मुंबईची तुंबई झाली होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला होता. रस्त्यांवर पाणी साचलं होतं. तर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं वाहतूक रुळावर येण्यास बरेच तास लागले होते. मुंबई आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशीही खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. मात्र, काही ठिकाणं अपवाद ठरली. तर मुंबईत बऱ्यापैकी उघडीप दिली होती. मात्र, आज सकाळपासूनच पावसानं पुन्हा हजेरी लावली. हवामान विभागानंही मुंबईला पुढील तीन ते चार दिवस येलो अॅलर्ट दिला आहे. वातावरण ढगाळ राहणार असून, दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहणार असल्याचाही अंदाज आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगडसह कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधारेचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

कल्याण, डोंबिवलीत रिमझिम

कल्याण, डोंबिवलीत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली. कल्याण, डोंबिवलीत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. पण साधारण ११ वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरूवात झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com