Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील २८ मंडळात अतिवृष्टी; ३९ दिवसात पावसाचे २६ बळी

Sambhajinagar News : राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. काही भागात जोरदार हजेरी लावली असून काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
Sambhajinagar News
Heavy RainSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर  : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागासह मराठवाड्यात आठही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील २८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या मंडळातील साधारण ५६० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात जीवितहानी देखील झाली आहे. 

Sambhajinagar News
Sambhajinagar Rain : एकीकडे पावसाचा हाहाकार तर संभाजीनगर जिल्ह्यात १० दिवसापासून पावसाची दडी; पिकांनी टाकल्या माना

राज्यात मागील काही दिवसांपासून (Rain) पाऊस सुरु आहे. काही भागात जोरदार हजेरी लावली असून काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान मराठवाड्याच्या अनेक भागात पावसानाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही मंडळाचा यात समावेश असून जवळपास ५६० गावे या जोरदार पावसामुळे चिंब झाली. तर (Sambhajinagar) संभाजीनगर जिल्ह्यातील ३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

Sambhajinagar News
Nashik Water Scarcity : दमदार पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा; प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

पेरणीच्या दृष्टीने हा पाऊस समाधानकारक असला तरी देखील विभागातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांना अद्याप मोठ्या (Heavy Rain) पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान या झालेल्या पावसामुळे आजपर्यंत पाण्यात वाहून जाणे, विज पडून मृत्यू होणे आदीं सारख्या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. तर ५५ गोठ्यांची पावसामुळे पडझड झाली. शिवाय ३८५ लहान-मोठी जनावरही दगावली आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com