Har Har Mahadev Movie: पिंपरीत 'हर हर महादेव'चा शो बंद पाडला; संभाजी ब्रिगेड आक्रमक

Har Har Mahadev Movie News: संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीष काळे आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या कार्याकर्त्यांसह मल्टिप्लेक्समध्ये शिरत घोषणाबाजी केली.
Har Har Mahadev Movie News
Har Har Mahadev Movie Newsज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

Har Har Mahadev Movie News: छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला (Marathi Movie) राज्यातून विरोध होत आहे. पिंपरी येथे हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आले आहे. पिंपरीमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी हातात भगवे झेंडे घेवून थेट चित्रपटगृहात घूसले आणि चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला. (Pimpari Latest News)

Har Har Mahadev Movie News
Marathi Movies: 'हर हर महादेव' चित्रपटाला वाढतोय विरोध; काय होतोय आरोप, सांगलीत आंदोलन

पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये हर हर महादेवचा शो संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) बंद पाडला आहे. हरहर महादेव चित्रपटातून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीष काळे आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या कार्याकर्त्यांसह मल्टिप्लेक्समध्ये शिरत घोषणाबाजी करत हे आंदोलन केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचाही चित्रपटाला विरोध

मराठा क्रांती मोर्चानेही हर हर महादेव चित्रपटाला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची चित्रपटांद्वारे अवहेलना होत असल्याने कारवाई करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वरे करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचं मुख्यमंत्र्यांना पत्र -

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने गौरवलेला स्वराज्याचा इतिहास ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यामातुन चुकीचा इतिहास तोटमोड करुन करुन दाखवला जात आहे. हे बाजारु लोक स्वराज्याचा इतिहासाची बदनामी करत आहेत. हर हर महादेव चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे सदर चित्रपट चित्रपटगृहात दाखवणे त्वरीत थांबवावे. (Latest Marathi News)

तसेच वेडात वीर दौडले सात नावाच्या चित्रपटाची घोषणा महेश मांजरेकर या दिग्दर्शकाने केली. त्यावेळी केलेल्या कार्यक्रमात मावळ्यांची वेषभूषा व पात्र निवड दरोडेखोरांसारखी असल्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. चुकिचा इतिहास दाखवत असल्याने प्रचंड चीड निर्माण झाली.

Har Har Mahadev Movie News
हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ब्राम्हण महासंघाने राज ठाकरेंना केलं 'हे' आवाहन

या प्रकरणी सबंधितांनी मिडिया समोर येऊन तमाम शिवप्रेमींची जाहिर माफी मागावी. तसेच कार्यक्रमाचे प्रोडक्शन हाऊस, दिग्दर्शक, निर्माता व संवाद लेखक यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, समाजमाध्यमातून याविषयी मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त होत आहे. सामाजिक शांततेसाठी दखल घेऊन कारवाई व्हावी. अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com