Marathi Movies: 'हर हर महादेव' चित्रपटाला वाढतोय विरोध; काय होतोय आरोप, सांगलीत आंदोलन

हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोप करीत चित्रपट निर्माते सुनिल फडतरे यांच्या सांगलीतील घरासमोर मावळा युवा महासंघाने आंदोलन केले.
Sangli Movement
Sangli Movement Saam Tv

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याला ग्रहण लागले आहेत. या चित्रपटावर आक्षेप घेतला असून चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याची तक्रार बांदल वंशजांनी केली होती.

Sangli Movement
Bigg Boss Marathi 4: विकास आणि अपूर्वामध्ये पुन्हा एकदा जुंपली, टास्क दरम्यान टीममध्ये तुफान राडा

हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोप करीत चित्रपटाचे निर्माते सुनिल फडतरे यांच्या सांगलीतील घरासमोर मावळा युवा महासंघाने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी निदर्शने आणि घोषणाबाजी केली आहे. यावेळी इतिहासाचे विकृतीकरण करून त्याची मांडणी करणाऱ्या निर्माते फडतरे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

Sangli Movement
Varun Dhawan : बॉलिवूडच्या एनर्जिटिक अभिनेत्याला गंभीर आजार, स्वतःच केला मोठा खुलासा

हर महादेव या चित्रपटात अतिशय खालच्या पातळीवर इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. याचा निषेध करत चित्रपटाचे निर्माता सुनिल फडतरे यांच्या घरासमोर शनिवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी इतिहासाचे विकृतीकरण करून त्याची मांडणी करणाऱ्या निर्मात्याच्या निषेधात घोषणा देण्यात आल्या. तसेच हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजां संबंधित जो इतिहास दाखवण्यात

आला आहे. तो चुकीचा आणि अवमान करणारा आहे. त्यामुळे निर्मात्यांनी तातडीने जो सत्य इतिहास आहे तो दाखवावा आणि चुकीचा इतिहास तातडीने चित्रपटातून वगळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Sangli Movement
Hardik And Akshaya Wedding: पाठकबाई आणि राणादाचे चाहत्यांना अनोखे गिफ्ट; पत्रिका आल्या पण तारीख गुलदस्त्यात

यावेळी मावळा युवा महासंघाच्या संस्थापक रुपाली पाटील म्हणतात, "निर्मात्यांनी या ऐतिहासिक चित्रपटात इतिहासाची विकृती केली आहे. चित्रपटाच्या निषेधार्थ आणि आमच्या काही मागण्या पुर्ण करण्यासाठी आम्ही निर्माते सुनिल फडतरे यांच्या सांगलीतील घरासमोर आंदोलन केले. आम्ही निर्मात्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्या हाकेला दाद दिली नाही.

चित्रपटातील सर्व कलाकारांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेत, संपूर्ण महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी. 'चित्रपटाचा अभ्यास न करता वैयक्तिक मुद्दे चित्रपट मांडण्यासाठी हा सिनेमा बनवला आहे.' हा मुद्दा तुमच्या पत्रकार परिषदेत येऊ द्या. येत्या १५ दिवसात जर माफी मागितली नाही तर निर्मात्यांच्या घरात जाऊन शिवाजी महाराजांचे मावळे काय असतात ते दाखवून देऊ."

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com