वाशी बाजारात हापूस आंब्याची मोठी आवक
दर १ ते दीड हजारांनी घसरले
ग्राहकांना मोठा दिलासा
अक्षय्य तृतीयेपूर्वी खरेदीची संधी
Mango Today Rate Falls In Mumbai Vashi Market News उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, वेध लागतात ते आंब्याचे. याचं आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर आंब्याच्या भावात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आंब्याची आवक मोठया प्रमाणात झाल्याने त्याचे दर १ ते दीड हजारांनी घसरले आहेत. त्यामुळे आता अक्षय्य तृतीयेपूर्वी नागरिकांचं तोंड गॉड होणार असून आंबा प्रेमींसाठी खरेदीची मोठी संधी आहे.
कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. यंदा बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, त्यामुळे आंब्याचे उत्पादन सुमारे ८० टक्क्यांनी घटले. परिणामी मार्चमध्ये बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती. त्यामुळे हापूस आंब्याच्या दारात कायम वाढ पाहायला मिळाली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशांना आंबा परवडत नव्हता. एप्रिल-मे हा हापूसचा मुख्य हंगाम मानला जातो. या कालावधीत उत्पादन आणि आवक वाढल्याने भाव नियंत्रणात येतात.
अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली आहे. सध्या बाजारात दररोज ५० हजारांहून अधिक पेट्यांची आवक होते आहे. परिणामी आंब्याच्या दरात १ ते डिड हजारांची घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. सध्या पाच डझनच्या आंब्याच्या पेटीचा भाव ४ ते साडेचार हजार रुपये आहे, परंतु आवक वाढल्यानं आणि त्यामुळे दर उतरल्यानं आता हापूस सर्वसामांच्या खिशाला परवडणारा आहे.
पुण्यातील मार्केटयार्डच्या इतिहासात प्रथमच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याला सर्वाधिक दर मिळाले. आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती समोर आली. दर वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ५० टक्क्यांनी मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक आवक फळ बाजारात कमी झाले आहेत. त्यामुळे भाववाढ झाल्याचे सांगितले जात आहे. घाऊक बाजारात सध्या पाच ते सात डझन (कच्च्या) आंब्यांचे दर ३ ते ६ हजार आहेत, तर तयार आंबा ५ ते ७ डझन आंब्यांची पेटी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपयांना विक्री होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.