Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! वंदे भारतनंतर मिळणार आणखी ४ नव्या ट्रेन, जाणून घ्या सविस्तर

Amrit Bharat Express For Punekar: वंदे भारत ट्रेननंतर आता पुणेकरांना आणखी ४ नव्या ट्रेन मिळणार आहे. पुण्यातून उत्तर भारतामधील शहरांसाठी ४ अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.
Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! वंदे भारतनंतर मिळणार आणखी ४ नव्या ट्रेन, जाणून घ्या सविस्तर
Amrit Bharat Express For PunekarSaam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

वंदे भारत एक्स्प्रेसनंतर विना वातानुकुलित अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असून प्रवाशांचा या एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारतपेक्षा तिकीट दर कमी असल्यामुळे आता पुण्यातून उत्तर भारतामधील शहरांसाठी ४ अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.

पुण्यातून दानापूर, छप्रा, मुझ्झफरपूर आणि पुरी या ४ मार्गांवर अमृत वंदे भारत सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यापैकी पुण्यातून दानापूर आणि छप्रा आणि हडपसर येथून मुझ्झफरपूर आणि पुरी या दोन ट्रेन सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन साप्ताहिक असण्याची शक्यता आहे. या ट्रेन सुरू झाल्यास उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून तिकीट दर देखील माफक असणार आहे.

Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! वंदे भारतनंतर मिळणार आणखी ४ नव्या ट्रेन, जाणून घ्या सविस्तर
Pune Traffic changes : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, काही रस्ते बंद, काही मार्गात बदल

पुणे शहर आणखी ४ नव्या शहरांना जोडले जाणार आहे. पुण्यातून अमृत भारत एक्सप्रेसने ४ शहरांना जोडले जाणार असून त्याचे तिकीट देखील कमी असणार आहे. अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्यानंतर त्या प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या.

Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! वंदे भारतनंतर मिळणार आणखी ४ नव्या ट्रेन, जाणून घ्या सविस्तर
Koyata Gang Pune : पुण्यातील कुख्यात कोयता गँगचे बीड कनेक्शन; पोलिसांच्या जाळ्यात म्होरक्या अडकला

मात्र, त्याचे तिकीट दर जास्त असल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी वंदे भारतमधून प्रवास करणे टाळतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने वंदे भारतसारखीच दिसणारी अमृत भारत एक्स्प्रेस नावाने विना वातानूकुलित आणि कमी तिकीट दर असलेली स्लिपर रेल्वे जुलै २०२३ मध्ये सुरू केली. कमी खर्चात आणि कमी वेळेत प्रवास होत असल्यामुळे सध्या अमृत भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती वाढत आहे.

Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! वंदे भारतनंतर मिळणार आणखी ४ नव्या ट्रेन, जाणून घ्या सविस्तर
JNPA To Pune Highway: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मुंबईचे अंतर होणार कमी, वाहतुक कोंडी सुटणार

अमृत भारत एक्स्प्रेसचा वेग देखील चांगला आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसचे जाळे वाढविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. त्यामधूनच पुणे रेल्वे स्टेशन येथून दोन आणि हडपसर रेल्वे स्थानकावरून दोन अशा ४ अमृत भारत एक्स्प्रेस चालविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. त्याबाबतची सर्व माहिती रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आली आहे. लकरच आता ही अमृत भारत एक्स्प्रेस पुणेकरांच्या सेवेमध्ये येणार आहे.

Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! वंदे भारतनंतर मिळणार आणखी ४ नव्या ट्रेन, जाणून घ्या सविस्तर
Pune Crime News: शरद मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायला आले आणि जेलमध्ये गेले; पुणे पोलिसांनी उधळला गँगवॉरचा कट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com