Vande Bharat Express: गर्दीवर उतारा! वंदे भारत ट्रेनला जोडणार आणखी ४ डबे; आता बिनधास्त प्रवास करा

Vande Bharat Express: सिंकदराबाद विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये ४ अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. याचा फायदा नक्कीच प्रवाशांना होईल.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSaam Tv
Published On

मेक इन इंडिया अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगवान धावत आहे. नुकतीच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं आनंदाची बातमी दिली आहे. सिंकदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये ४ अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत आता १६ ऐवजी २० डब्यांसह धावणार आहे.

सिंकदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये ४ अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी या ट्रेनमध्ये १,१२८ प्रवासी बसण्याची क्षमता होती. जी आणखीन चार डबे जोडल्यानंतर १,४४० प्रवांशांना घेऊन धावणार आहे. यासंदर्भातील माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं शुक्रवारी दिली होती. वंदे भारत रेल्वेसाठी प्रवांशाची वाढती मागणी लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Vande Bharat Express
Crime News: पिंकीला कुणी मारलं? हत्येनंतर ६ महिने फ्रीजमध्ये ठेवलं, भयंकर घटनेचं रहस्य उलगडलं

सिंकदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये २० डबे असल्याकारणाने चेअर कारची संख्या १८ होईल, ज्यामध्ये १,३३६ प्रवासी प्रवास करू शकतील. पूर्वी या ट्रेनमध्ये १४ चेअर कार होत्या, ज्यात १,०२४ प्रवासी प्रवास करत होत्या. तसेच या वंदे भारत ट्रेनमध्ये २ एक्सिक्युटिव्ह क्लास बोगी आहेत. ज्यात १०४ प्रवासी प्रवास करतील. अशा प्रकारे आता एकूण १,४४० प्रवासी वंदे भारतमधून प्रवास करू शकतील.

Vande Bharat Express
Indian Railways: विनातिकीट प्रवास करण्याची चूक पडेल महागात; टीटीई प्रवाशाला किती दंड आकारतो?

याबाबत जीएम अरूण कुमार सांगतात, आणखीन चार डबे जोडल्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना वंदे भारत ट्रेनचा लाभ घेता येईल. विशेषत: मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. ज्यांना वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करायचा आहे, डबे वाढल्यामुळे याचा नक्कीच फायदा प्रवाशांना होईल. तसेच ४ डबे जोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com