Pune Ayodhya Train: पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार १५ विशेष रेल्वेगाड्या; कधी अन् केव्हा? जाणून घ्या सविस्तर...
Pune to Ayodhya Trains Ticket Booking
अयोध्येतील राम मंदिराचं काम पूर्ण झालं असून येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी रामभक्त आतुर आहेत. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातून अयोध्यासाठी १५ विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अयोध्याला जाण्यासाठी रेल्वेगाड्या सोडा, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी पूर्ण केली असून पुण्यातून अयोध्यासाठी ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येईल. (Latest Marathi News)
दोन दिवसाला एक गाडी असं नियोजन करण्यात आलं आहे. या सर्व विशेष रेल्वेगाड्या स्लीपर कोचच्या असणार आहेत. यामध्ये प्रवाशांना सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत.
त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या रेल्वेगाड्यांसाठी तिकीटांचे बुकिंग कधीपासून सुरू होणार, याची माहिती अद्यापही रेल्वे प्रशासनाने दिली नाही. मात्र, लवकरच बुकिंग सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे.
पुण्यातून अयोध्याला सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचा प्रतिसाद पाहून पुढे विशेष गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असंही रेल्वेकडून सांगण्यात आळं आहे. दुसरीकडे कोल्हापूरहून देखील अयोध्यासाठी विशेष गाडी सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

