

मुंबई वीज दर कपात
टाटा पॉवर दर कमी
2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दर कमी करण्याची योजना
१ एप्रिल २०२६ रोजी नविन आर्थिक वर्षे सुरु झाले असून या दिवशी अनेक महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांमधला एक फायदा मुंबईकरांना झाला आहे. यामध्ये वीज दरात कपात करण्यात आली आहे. कारण वीज पुरवणाऱ्या कंपन्यांनी म्हणजेच, बेस्ट, टाटा पावर आणि अडानी इलेक्ट्रिसीटी कंपन्यांनी त्यांचे विजेचे दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात येतील. यामुळे मे महिन्यात येणारे विजेचे दर कमी असणार आहेत.
महाराष्ट्रात आधीच महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (MERC) कडून महावितरणच्या वीजदर कपात करण्याची मंजुरी देण्यात आली होती. त्याचा फायदा मुंबईकरांना आता होणार आहे. तसेच 2030 पर्यंत हे दर टप्प्याटप्प्याने कमी होतील असे नियोजन करण्याच्या शासन तयारीत आहे. याचा फायदा मुंबईतल्या नागरिकांना, व्यावसायिकांना आणि औद्योगिक क्षेत्रातल्या ग्राहकांना सुद्धा होईल.
बेस्टच्या ग्राहकांसाठीचे विजेचे दर
नव्या विजेच्या दरांनुसार बेस्टच्या ग्राहकांना 101 ते 300 युनिटसाठी पुर्वी 7.43 रुपये द्यावे लागत होते. आता हे दर 7.17 रुपये करण्यात आले आहेत. तर 500 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी दर 14.11 रुपयांवरून 13.07 रुपये करण्यात आले आहेत.
टाटा पॉवरचे विजेचे दर
टाटा पॉवरच्या बाबतीत 101 ते 300 युनिटसाठी दर 7.96 रुपयांवरून 7.10 रुपये करण्यात आले आहेत. तसेच 301 ते 500 युनिटसाठी मोठी कपात करत हे दर 13.55 रुपयांवरून 11.64 रुपये करण्यात आले आहेत. अडानी इलेक्ट्रिसिटीनेही मोठी कपात जाहीर केली असून 0 ते 100 युनिटसाठी दर 6.38 रुपयांवरून 4.93 रुपये करण्यात आला आहे. यामुळे सगळ्यांना महागाईच्या दिवसांमध्ये ही एक मदत मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.