Girish Mahajan : देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून काही होणार नाही; गिरीश महाजन जरांगेंना असे का म्हणाले? वाचा

girish Mahajan on Manoj Jarange patil : मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सोडलं. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून काही होणार नाही; गिरीश महाजन जरांगेंना असे का म्हणाले? वाचा
Girish Mahajan Saam tv
Published On

नाशिक : जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून काही होणार नसल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. गिरीश महाजन म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिलं होतं. आता त्यांना टार्गेट करून काहीही होणार नाही. आरक्षण ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे'.

देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून काही होणार नाही; गिरीश महाजन जरांगेंना असे का म्हणाले? वाचा
BJP Video : भाजप 160 जागा लढवण्यावर ठाम ? मोठी माहिती आली समोर

'उत्तर महाराष्ट्र भाजपला सर्वाधिक जागा जिंकून देणारा विभाग'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य करताना महाजन म्हणाले, अमित शहा हे संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते जोशात आहेत. उत्तर महाराष्ट्र हा भाजपला सर्वाधिक जागा जिंकून देणारा विभाग आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्रातून येतील'.

अमित शहा (Amit Shah) यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. यातील एका वक्तव्यावरून महाजन यांनी भाष्य केलं. 'अमित शहा यांनी फोडा, तोडा असे काही सांगितलं नाही. आपल्याच कार्यकर्त्यांना कामाला लागण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत कुणीही भांडत नाही. सर्वांना जीव ओतून काम करायला सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून काही होणार नाही; गिरीश महाजन जरांगेंना असे का म्हणाले? वाचा
Uddhav Thackeray: 'बाजारबुणग्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचाय; हिंमत असेल तर...', अमित शहांच्या दौऱ्यावरुन ठाकरेंनी तोफ डागली!

उद्धव ठाकरेंनी पात्रता ओळखावी - गिरीश महाजन

उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर टीका केली. यावर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी आपली पात्रता ओळखली पाहिजे. आमच्या नेत्यांवर बोलतात. उद्धवजी सुसंस्कृत नेते आहेत. त्यांचा पक्ष डबक्या सारखा आहे. त्यांचे फक्त ७ खासदार आहेत. तर आमचे सर्वात जास्त खासदार आहेत. हे कोरोना काळात घरात बसून राहिले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com