Sharad Mohol Case Update: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Sharad Mohol Death Case: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
Sharad Mohol Case Update
Sharad Mohol Case UpdateSaam Tv

>> सचिन जाधव

Sharad Mohol Case Update News:

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणेला (Ganesh Marne) अखेर पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर येथून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना बघून त्यांना पळ काढला होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलं आणि बेड्या ठोकल्या.

त्याच्यासोबत इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Mohol Case Update
Hemant Soren Resign: मोठी बातमी! हेमंत सोरेन यांनी दिला राजीनामा, चंपाई सोरेन झारखंडचे नवीन मुख्यमंत्री

मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड गणेश मारणेला (Ganesh Marne) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, याआधी गणेश मारणेने (Ganesh Marne) अटकपुर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळला होता. मारणे याला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. यानंतरही तो गेले अनेक दिवस तो फरार होता. मात्र आज तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

Sharad Mohol Case Update
Jharkhand News: ईडी अधिकाऱ्यांची अडचण वाढणार, CM सोरेन यांनी दाखल केली एफआयआर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दरम्यान, शरद मोहोळ हत्या प्रकरणात आत्तापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता याप्रकरणातील मारणे आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते. मारणे याला अटक झाल्याने याप्रकरणी तपास आणखी वेगाने पुढे वाढले. तसेच याप्रकरणी नवीन माहिती समोर येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com