घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्यांची निवडणूक – भाजप नेत्याचा घोसाळकर आणि ठाकरेंवर हल्लाबोल

Mumbai Civic Election BJP Vs Shiv Sena Thackeray Group: प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणूक घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्यांची असल्याचा आरोप करत भाजप उमेदवार गणेश खणकर यांनी उद्धव ठाकरे आणि घोसाळकर कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
BJP candidate Ganesh Khankar addressing supporters during the Ward 7 election campaign in Mumbai.
BJP candidate Ganesh Khankar addressing supporters during the Ward 7 election campaign in Mumbai.Saam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दहिसर, बोरीवली आणि कांदिवली परिसरातील अनेक शाखांना भेटी देत प्रचाराला वेग दिला. मात्र या दौऱ्यावर भाजपचे प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार गणेश खणकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “उद्धव ठाकरे आणि विनोद घोसाळकर यांची ही निवडणूक घराणेशाही वाचवण्यासाठीची आहे, तर आमची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, असा आरोप केला.

BJP candidate Ganesh Khankar addressing supporters during the Ward 7 election campaign in Mumbai.
Kalyan : आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही... कपिल पाटलांची ठाकरे बंधूंवर सणसणीत टीका

खणकर म्हणाले की, भाजपाकडून एक सामान्य कार्यकर्ता मैदानात उतरला असून ही लढाई कार्यकर्त्यांच्या मेहनतीची आणि जनतेच्या विश्वासाची आहे. “बूथ प्रमुख ते मुंबई महामंत्री असा माझा प्रवास कार्यकर्त्यांच्या पाठबळावर झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी नसून प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

BJP candidate Ganesh Khankar addressing supporters during the Ward 7 election campaign in Mumbai.
उमेदवारीबाबत भाजपचा आदर्श वस्तुपाठ; माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून सोडली उमेदवारी

मुंबईचा विकास, सुरक्षितता आणि बदलत्या रंगासाठी ही निवडणूक असल्याचे सांगत खणकर यांनी, “मुंबईचा रंग बदलू न देण्याची जी प्रतिज्ञा आमच्या मुंबई अध्यक्षांनी घेतली आहे, त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. हळूहळू मुंबईची जनता विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून सुरक्षित मुंबईसाठी आग्रहाने मतदान करेल,” असा विश्वास व्यक्त केला.

BJP candidate Ganesh Khankar addressing supporters during the Ward 7 election campaign in Mumbai.
Coastal Road : कोस्टल रोडवरून श्रेयवाद! ठाकरेंच्या आरोपाला शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले बिनडोक...

उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीवर टीका करताना खणकर म्हणाले, काल त्या ठिकाणी काय परिस्थिती होती हे सर्वांनी पाहिले आहे. आज आमच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आनंदी चेहरेच आमच्या विजयाची नांदी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे आपला विजय अधिक सोपा झाला असल्याचा दावाही त्यांनी केला.

प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप उमेदवार गणेश खणकर यांच्याविरोधात शिवसेना (ठाकरे गट) कडून माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र सौरभ घोसाळकर मैदानात उतरले असून, ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्यांची अशी थेट लढत बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com