Kalyan : आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही... कपिल पाटलांची ठाकरे बंधूंवर सणसणीत टीका

KDMC Municipal Election Kapil Patil : कल्याण महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कपिल पाटील यांनी मनसे व ठाकरे गटावर दिशाभूल आणि भाजप बदनामीचे गंभीर आरोप केले. पोलिस दबावाचे दावे फेटाळून लावत उमेदवार मर्जीने गेले होते, असे स्पष्ट केले.
Kalyan : आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही... कपिल पाटलांची ठाकरे बंधूंवर सणसणीत टीका
KDMC Municipal Election Kapil PatilSaam Tv
Published On
Summary
  • कल्याण प्रचारात कपिल पाटील यांचा मनसे व ठाकरे गटावर थेट हल्ला

  • पोलिस दबाव व उमेदवार जबरदस्ती आरोप फेटाळले

  • विरोधकांकडून संभ्रम पसरवून मते वळवण्याचा डाव – पाटील

  • कायदेशीर लढाईचा वापर करण्यास आक्षेप नाही; जनतेला वास्तव ओळखण्याचे आवाहन

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यात येत्या काही दिवसांत महापालिका निवडणुकांचा धुरळा उडणार असून सगळेच पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी मतदारसंघांना भेट देऊन मतदारांना आपले म्हणणे पटवून देत आहेत. अशातच आता कल्याणमध्ये प्रचारादरम्यान कपिल पाटील यांनी मनसे व ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उमेदवारांवर पोलिसांकडून दबाव टाकल्याचे आणि त्यांना जबरदस्तीने नेल्याचे आरोप हे दिशाभूल करणारे असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मते डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

कपिल पाटील म्हणाले, सगळे एकत्र येऊनही काही चालत नाही, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. जनतेला संभ्रमात टाकायचे, दिशाभूल करायची आणि त्यातून मते कशी मिळतील याचा प्रयत्न केला जात आहे.

Kalyan : आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही... कपिल पाटलांची ठाकरे बंधूंवर सणसणीत टीका
Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?

पोलिसांनी उमेदवारांना शिंदे साहेबांकडे नेल्याचा आरोप फेटाळून लावताना पाटील म्हणाले, ज्या मनसेच्या उमेदवारांबाबत हे आरोप करण्यात येत आहेत, त्या उमेदवारांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, मी माझ्या मर्जीने दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो होतो. तरीही खोटे आरोप पसरवले जात आहेत. उमेदवारांनी माघार घेतली की नाही, याची खरी माहिती संबंधितांकडेच आहे.

Kalyan : आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही... कपिल पाटलांची ठाकरे बंधूंवर सणसणीत टीका
Earthquake Alert : भल्या पहाटे आसाम भूकंपाने हादरले, मध्यरा‍त्री नागरिक घराबाहेर पळाले, वाचा किती रिश्टर स्केलची तीव्रता

बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, तुमचेही उमेदवार बिनविरोध आले असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही. प्रयत्नच न करता आरोप करणे योग्य नाही. न्यायालयीन प्रक्रियेबाबत बोलताना कपिल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. राज्यात आणि देशात जे जे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत, त्या सर्व तरतुदींचा त्यांनी वापर करावा. जिथे कायद्याने अधिकार दिले आहेत, तिथे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात समाधान होईपर्यंत न्याय मागावा. त्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही,असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कपिल पाटील यांनी जनतेने वास्तव ओळखून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com