समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Mumbai Ship Tragedy: मुंबईतील गोराई-मनोरी समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या विदेशी जहाजात चोरी करण्यासाठी गेलेल्या चौघांचा संशयित विषारी वायू गळतीमुळे मृत्यू झाला. घटनेचा गोराई पोलिसांकडून तपास सुरू आहे.
MUMBAI SHIP TRAGEDY
MUMBAI SHIP TRAGEDYsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: बोरिवली पश्चिमेकडील गोराई-मनोरी समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या विदेशी जहाजात चोरी करण्यासाठी गेलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी वायूची गळती झाल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. चार महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे हे विदेशी जहाज समुद्रकिनाऱ्यावर येऊन अडकले होते. मागील महिनाभरापासून या जहाजावर चोरट्यांकडून वारंवार चोरी होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याआधी दोन वेळा जहाजात प्रवेश करून अडीच आणि पाच रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

MUMBAI SHIP TRAGEDY
भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणात खळबळ

तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आठ जणांची टोळी स्पीडबोटच्या मदतीने जहाजावर गेल्याची माहिती आहे. यातील एक जण स्पीडबोटमध्ये थांबला, तर सात जण जहाजाच्या आतील भागात गेले. त्यापैकी चौघे जहाजातील पाईप गॅस कटरच्या साहाय्याने कापण्यासाठी गेले होते. पाईप कापण्याचा प्रयत्न सुरू असताना जहाजाच्या आतील भागात विषारी वायूची गळती झाल्याचा संशय आहे. या विषारी वायूमुळे आत गेलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

MUMBAI SHIP TRAGEDY
Accident : नाशिकवरून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला; मुंबईच्या ४ जणांचा मृत्यू, वाहनाचा चेंदामेंदा, ६ गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक भाजप नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टरच्या मदतीने चौघांचे मृतदेह जहाजातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृत चौघांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

MUMBAI SHIP TRAGEDY
Mumbai News: बायकोच्या अनैतिक संबंधावरून वाद, कामावर गेलेला सीए घरी परत आलाच नाही; मुंबईत खळबळ

दरम्यान चोरट्यांचा जहाजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, चोरीची पद्धत आणि या घटनेमागील टोळीचा शोध घेण्यासाठी गोराई पोलिसांकडून तपास सुरू आहे. जहाजाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तो परदेशात फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या जहाजाचा वापर तेलाशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com