Kalyan News: कल्याणमध्ये 4 धाडसी तरूणांमुळे मोठा अनर्थ टळला, ऐन दिवाळीत आलं होतं मोठं संकट

Four Youths Extinguish Fire In Kalyan: कल्याणच्या शहाड परिसरात फटाक्यांमुळे लागलेली आग चार तरुणांच्या धाडसाने विझवली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरात त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Four brave youths from Kalyan’s Shahad area extinguished a fire caused by firecrackers, preventing a major disaster during Diwali celebrations.
Four brave youths from Kalyan’s Shahad area extinguished a fire caused by firecrackers, preventing a major disaster during Diwali celebrations.Saam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: दिवाळीत फटाके फोडल्यामुळे आग लागली होती. मात्र चार तरुणांच्या प्रसंगवधनामुळे मोठा अनर्थ टळला.कल्याणजवळील शहाड परिसरात मयूर टेलर या दुकानात फटाक्यांमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, या आगीने विक्राळ रूप धारण करण्याआधीच चार तरुणांनी धाडस दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले.

Four brave youths from Kalyan’s Shahad area extinguished a fire caused by firecrackers, preventing a major disaster during Diwali celebrations.
Maharashtra Politics: पुण्यातील बड्या नेत्याने दिवाळीचा मुहूर्त साधला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सूचक पोस्ट

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर टेलर या दुकानासमोर फटाके फोडले जात होते. त्यातील ठिणग्या दुकानात गेल्याने आग लागली. काही क्षणांतच धूर व ज्वाळा उठू लागल्या. परिसरात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी किरण मोरे आणि त्याचे तीन साथीदार कोणतीही भीती न बाळगता पुढे सरसावले. त्यांनी ग्रीलवर चढून फायर एक्सटिंग्विशर आणि बादलीतील पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले

Four brave youths from Kalyan’s Shahad area extinguished a fire caused by firecrackers, preventing a major disaster during Diwali celebrations.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! पालिका निवडणुकांआधीच दमदार नेत्याचा राजीनामा

या प्रयत्नात किरण मोरे किरकोळ जखमी झाला असला तरी त्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग शेजारील दुकानांपर्यंत पसरली नाही. दरम्यान, अग्निशमन दलानेही घटनास्थळी तातडीने पोहोचून आग पूर्णपणे विझवली. या चार तरुणांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे परिसरातील नागरिकांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

Four brave youths from Kalyan’s Shahad area extinguished a fire caused by firecrackers, preventing a major disaster during Diwali celebrations.
Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

50 रुपये देण्यास नकार दिला अन्...

दरम्यान कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोड परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. फक्त ५० रुपयांच्या खंडणीसाठी एका नशेखोराने स्थानिक दुकानदारावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असून तो याआधी एमपीडीए अंतर्गत दीड वर्ष तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो सुटून बाहेर आला आणि पुन्हा गुन्हेगारी मार्गावर सक्रिय झाला आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना पोलिस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडली असून, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com