ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वात बुद्धिमान पाळीव कुत्र्यांच्या जातींपैकी एक, बॉर्डर कॉलीज हे जलद शिकण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात.
पूडल्स केवळ गोंडसच नाहीत तर ते हुशार देखील आहेत. त्यांना प्रशिक्षित करणे सोपे असते. यामुळे ते कुटुंबासाठी परफेक्ट पाळीव प्राणी आहेत.
हे निष्ठावंत, धाडसी, अत्यंत बुद्धिमान आणि आज्ञाधारक असतात. तसेच पोलिस आणि लष्करी भूमिकांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
गोल्डन रिट्रीव्हर हे फ्रेंडली आणि लवकर शिकणारे असतात ज्यामुळे ते कुटुंबांसाठी एक उत्तम साथीदार बनतात. गोल्डन रिट्रीव्हर्स हुशार असतात आणि ते त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात.
डोबरमॅन ही शक्तिशाली, सतर्क आणि हुशार पाळीव कुत्र्यांची जात आहे. त्यांना प्रशिक्षित करणे सोपे असते. ते त्यांच्या निष्ठा आणि संरक्षणासाठी ओळखले जातात.
सर्वात लोकप्रिय पाळीव कुत्र्यांच्या जातींपैकी एक, लॅब्राडोर रिट्रीव्हर्स. हे बुद्धिमान, फ्रेंडली असतात. ज्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणे सोपे होते.
पॅपिलॉन ही लहान पण हुशार पाळीव कुत्र्यांच्या जाती आहेत. ते ऊर्जा आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात.