Mumbai Fire Accidents: मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ; मुख्य कारण आलं समोर

Mumbai : मुंबईत गेल्या काही दिवसात भीषण आगीच्या घटना समोर आल्या आहेत. या आगीच्या घटनांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे मुंबईतील आगीच्या घटना या चिंतेचा विषय बनत आहेत.
Mumbai Fire Accidents
Mumbai Fire AccidentsSaam Tv
Published On

Fire accidents In Mumbai Increased:

मुंबईत गेल्या काही दिवसात भीषण आगीच्या घटना समोर आल्या आहेत. या आगीच्या घटनांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे मुंबईतील आगीच्या घटना या चिंतेचा विषय बनत आहेत. त्यामुळे अशा आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरती प्रयत्न केले जात आहे.

मुंबईतील आगीच्या घटनांमध्ये यावर्षी आतापर्यंत ३३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा खूप मोठा आहे. २०२२ च्या तुलनेत मृतांचा आकडा अडीचपट जास्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आगीच्या घटनांचे मुख्य कारण शॉर्ट सर्किट असल्याचे अग्निशनम दलाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वर्षातून दोनदा फायर ऑडिट प्रमाणे इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची शिफारस अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबई महापालिकेने देखील यासाठी सहमती दर्शवली आहे.

इलेक्ट्रिक ऑडिट सर्व इमारतींसाठी बंधनकारक करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी इलेक्ट्रिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. आगीच्या घटनांचं मुख्य कारण माहित असताना या आगीच्या घटना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबवणे गरजेचं आहे, असं बीएसमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Mumbai Fire Accidents
ED Raid in Mumbai : दादरचे प्रसिद्ध साडीचे दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीची धाड; इतर ५-६ ठिकाणी झाडाझडती

मुंबईत यावर्षी आतापर्यंत ४७२१ आगीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 7 टक्क्याने वाढली आहे. यात 290 लोक जखमी झाली आहे. २०२२ च्या तुलनेत जखमींची संख्या ८० टक्क्यांनी वाढली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत झालेच्या घटनांमध्ये मृत नागरिकांमध्ये ३२ टक्के महिलांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ३० टक्के महिला आहे.

गेल्या वर्षी ४४१७ आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यात १३ लोकांचा मृत्यू तर १६० जण जखमी झाले होते. २०२१ मध्ये ४०६५ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात १९ लोकांचा मृत्यू तर १७३ लोक जखमी झाले होते.

Mumbai Fire Accidents
Pune News: चेष्टा, मस्करी नडली! एअर कॉम्प्रेसरने पोटात हवा भरल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com