Girgaon Fire News Update : गिरगावमधील इमारतीला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

Girgaon Fire News Update : इमारतीचे जिने लाकडाचे असल्याने आग सर्व मजल्यांवर पसरली. दुसऱ्या मजल्यापासून वरच्या दिशेनं जाणाऱ्या पायऱ्या पेटून तुटल्या.
Girgaon Fire News Update
Girgaon Fire News UpdateSaam Tv
Published On

Mumbai Fire News :

गिरगाव चौपाटी येथील गोमती भवन इमारतील आग लागल्याची घटना शनिवारी रात्री समोर आली होती. या आगीच्या घटनेत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वयोवृद्ध महिला आणि पुरुष यांचा समावेश आहे.

इमारतीचे जिने लाकडाचे असल्याने आग सर्व मजल्यांवर पसरली. दुसऱ्या मजल्यापासून वरच्या दिशेनं जाणाऱ्या पायऱ्या पेटून तुटल्या. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना वर जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. (Latest News)

शनिवारी रात्रीच्या सुमारास गोमती भवन या तीन मजली इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाला आगीची मिळताच, १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.

इमारत जुनी असल्याने त्याचे जिने लाकडी होते. आगीनंतर जिने जळून खाक झाले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना देखील आग विझवण्यात अडथळा येत होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीत हिरेन शाह आणि नलिनी शाह या दोन वृद्ध नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ९ जणांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com