Hiwali Adhiveshan 2023 : हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात; शिवसेना ठाकरे-शिंदे गटात जुंपणार, केंद्रस्थानी मुंबई महापालिका

Political News : उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि कंत्राटदारावरून एकनाथ शिंदेवर टीका केली होती. यावरुन शिंदे गटाकडूनही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
Shivsena
Shivsena Saam TV
Published On

Nagpur Winter Session :

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागरपूरमध्ये सुरु होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ऐन हिवाळ्यात अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण सरकारला घेरण्यासाठी विरोधीपक्षांना जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून या आरोपांना देखील जशासतशी उत्तरे दिली जाण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनात मुंबई महापालिकेवरुन शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जुंपण्याची शक्यता आहे. नुकतेच उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि कंत्राटदारावरून एकनाथ शिंदेवर टीका केली होती. यावरुन शिंदे गटाकडूनही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivsena
Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे 'एक पाऊल पुढे'; महाराष्ट्रातील लोकसभा, राज्यसभा खासदारांना एकत्र आणणार

ठाकरे गटाची रणनिती

ठाकरे गट हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोट ठेवण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील शेतकरी गारपीट आणि अवकाळीमुळे अडचणीत सापडला आहे. या मुद्द्यावरुन देखील ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. ललित पाटील प्रकरण देखील हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

Shivsena
Governor Ramesh Bais on School Time : राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपाल यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

ठाकरे गटावरील आरोप

शिंदे गटाकडून देखील हिवाळी अधिवेशनात कोविड घोटाळे, रस्ते घोटाळे, नाले सफाई घोटाळे आणि खिचडी घोटाळ्यांवरून ठाकरे गटाला लक्ष केले जाऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते विविध घोटाळ्याच्या चौकशीत अडकलेले आहेत.

यावरून ठाकरे गट देखील आक्रमक झाला असून हिवाळी अधिवेशन मुंबईच्या मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतात की सत्ताधारी ठाकरे गटाला धारेवर धरतात हे उद्यापासून स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com