भेसळयुक्त दुधानंतर आता FDAच्या निशाण्यावर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने; 34.61 लाखांचा साठा जप्त

FDA Raid On Illegal Cosmetic : एफडीएने संपूर्ण महाराष्ट्रात चुकीची माहिती असलेली आणि परवाना नसलेली सौंदर्यप्रसाधने यांच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई, कराड आणि कांदिवली येथे टाकलेल्या छाप्यांदरम्यान ३४.६१ लाख रुपये किमतीची उत्पादने जप्त करण्यात आली.
FDA Raid On Illegal Cosmetic :
FDA SEIZES MISBRANDED COSMETICS WORTH ₹34.61 LAKH, TUKARAM MUNDHE'S CRACKDOWN INTENSIFIESsaam tv
Published On
Summary
  • भेसळयुक्त दूध आणि गुटख्यानंतर FDA ने आता मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई सुरू केली.

  • राज्यभरातील छापेमारीत 34.61 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

  • कराड, क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथे मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

प्रतिबंधित गुटखा, तंबाखू पदार्थ आणि भेसळयुक्त दुधाविरोधात धडक कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मिसब्रँडेड आणि विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांविरोधात मोहीम सुरू केली आहे. राज्यातील विविध भागांत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 34 लाख 61 हजार रुपयांच्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त आणि प्रतिबंधित करण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत कराड, मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथील आस्थापनांवर छापे टाकण्यात आले.

FDA Raid On Illegal Cosmetic :
तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कराडमध्ये 29.45 लाखांचा साठा प्रतिबंधित

गोपनीय माहितीच्या आधारे 12 जून रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथील मे. राजलक्ष्मी टेलीकम्युनिकेशन या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. तपासणीत विक्रीसाठी ठेवलेली विविध सौंदर्यप्रसाधने आढळून आली. उत्पादनांची पडताळणी करताना अनेक उत्पादनांच्या बाह्य पॅकिंगवर बॅच क्रमांक आणि उत्पादन दिनांक नमूद असला तरी आतील बाटल्यांवर आवश्यक माहितीच नसल्याचे निदर्शनास आले.

FDA Raid On Illegal Cosmetic :
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा राज्यभरात धडाका; शिर्डीनंतर शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDAचा छापा

काही उत्पादनांवर उत्पादकाचे नाव व तपशीलही उपलब्ध नव्हते. त्यामुळे ही उत्पादने मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. या प्रकरणात 29 लाख 45 हजार 375 रुपयांचा साठा प्रतिबंधित करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भ्रामक दावे करणारी उत्पादने जप्त

13 जून रोजी मुंबईतील ब्युटी सेंटर, क्रॉफर्ड मार्केट येथे करण्यात आलेल्या तपासणीत काही सौंदर्यप्रसाधनांवर आवश्यक वैधानिक माहिती नसल्याचे आढळले. यामध्ये स्तनवाढ, नितंबवाढ, वजन कमी करणे आणि त्वचा उजळविण्यासारखे दावे करणाऱ्या उत्पादनांचा समावेश होता. संबंधित उत्पादनांवर उत्पादक, परवाना क्रमांक आणि बॅचची माहिती अपुरी असल्याने 1 लाख 20 हजार 152 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

कांदिवलीत विनापरवाना उत्पादन युनिटवर धाड

मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथील एम/एस रेडियंट क्रिएशन्स या संस्थेवर टाकलेल्या छाप्यात विनापरवाना औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले.

तपासणीदरम्यान सौंदर्यप्रसाधनांचा साठा, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या कारवाईत 3 लाख 96 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com