भोंदूबाबाचा महिलेवर लैंगिक अत्याचार; कौटुंबिक वाद सोडवण्याच्या बहाण्याने घातला ५० लाखांचा गंडा

Fake Godman Physical Assault Case In Pune: पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदू बाबाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार आणि ५० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
A shocking case in Pune where a fake godman allegedly sexually assaulted and defrauded a woman of over ₹50 lakh under the pretext of solving family disputes.
A shocking case in Pune where a fake godman allegedly sexually assaulted and defrauded a woman of over ₹50 lakh under the pretext of solving family disputes.saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: अंगात दैवीशक्तीचा संचार असून, कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवत एका भोंदूने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भोंदूने बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून या महिलेला ५० लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

A shocking case in Pune where a fake godman allegedly sexually assaulted and defrauded a woman of over ₹50 lakh under the pretext of solving family disputes.
Sanjay Raut On Ashish Shelar | खालच्या पातळीचे लोक खालच्या शब्दात टीका करतात- संजय राऊत

औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या भोंदूचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षीय पीडित महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद असल्याने ते वेगळे राहत आहेत. पाच वर्षांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत या महिलेची गडदे याच्याशी भेट झाली. त्यावेळी गडदे याने आपण देवऋषी असल्याचे महिलेला भासविले. ‘माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार असून, मी तुमचे कौटुंबिक मतभेद दूर करतो,’ असा विश्वास संपादन करून त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले.

A shocking case in Pune where a fake godman allegedly sexually assaulted and defrauded a woman of over ₹50 lakh under the pretext of solving family disputes.
#Shorts : Mumbai Water Shortage News | मुंबईवर मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट?

त्यानंतर त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही त्याने लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव परिसरातील लॉजवर बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.

A shocking case in Pune where a fake godman allegedly sexually assaulted and defrauded a woman of over ₹50 lakh under the pretext of solving family disputes.
#Shorts : Maharashtra Water News : राज्यावर जलसंकटाचे सावट

गुंतवणुकीच्या आमिषाने उकळले लाखो रुपये -

कौटुंबिक मतभेद सोडविण्यासह आरोपी गडदे याने महिलेला नोकरीस लावण्याचे आणि बांधकाम व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचेही आमिष दाखवले. मे २०२१ पासून त्याने महिलेकडून रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, अखेर महिलेने ११ एप्रिल रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com