Mumbai Metro Politics: मुंबई मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात फडणवीसांना सरकारकडून निमंत्रण नाही

Mumbai Metro Politics News: विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांचं नाव आहे.
Fadnavis is not invited to the inauguration ceremony of Mumbai Metro
Fadnavis is not invited to the inauguration ceremony of Mumbai MetroSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबई मेट्रोच्या 2-ए (Metro 2A) आणि मेट्रो ७ या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. उद्या होणाऱ्या मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यास (Inauguration Ceremony) राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. राज्य सरकारच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचं नाव नसल्यानं भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांचं नाव आहे, त्यामुळे फडणवीसांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून जाणीपूर्वक वगळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Fadnavis is not invited to the inauguration ceremony of Mumbai Metro)

हे देखील पहा -

आजच (१ एप्रिल) भाजपच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे शहरात जोरदार बॅनरबाजी करत मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत शिवसेनेला डिवचले होते. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो असून 'काम केलंय मुंबईने पाहिलंय' असं लिहिण्यात आलं. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या (Mumbai Metro) ३३७ कि.मी. १,४०,४३३ कोटी रुपये असा आशय लिहीत देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना काय प्रत्युत्तर देते याकजे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेल सेनेने फडणवीसांना थेट निमंत्रण पत्रातूनच वगळल्याने शिवसेनेने चांगलीच खेळी खेळली आहे.

मार्गः २ ए (Metro 2A Line)

स्थानके: दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्टेशन (आनंद नगर), कंदरपाडा (रुषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एकसर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहारी एकसर (शिंपोली, नंतर शिंपावली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वलनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहारी गोरेगाव (बांगूर नगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्री नगर ) आणि अंधेरी पश्चिम (डीएन) नगर ).

Fadnavis is not invited to the inauguration ceremony of Mumbai Metro
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदही घ्यावे; शिवसेना नेत्याची मागणी

मार्ग: मेट्रो ७ (Metro 7 Line)

स्थानके: दहिसर पूर्व, ओवारीपारा, राष्ट्रीय उद्यान, देवीपारा, मागाठाणे, पोईसर (पूर्वीचे महिंद्रा अँड महिंद्रा), आकुर्ली (पूर्वीचे बांडोंगरी), कुरार (पूर्वीचे पुष्पा पार्क), दिंडोशी (पूर्वीचे पठाणवाडी), आरे, गोरेगाव ई (पूर्वीचे महानंद), जोगेश्वरी ई (पूर्वीचे जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (पूर्वीचे अंधेरी पूर्व).

मेट्रो भाडे (Mumbai Metro Fare 2022):

• ०-३ किमी: १० रुपये

• ३-१२ किमी: २० रुपये

• १२-१८ किमी: ३० रुपये

• १८-२४ किमी: ४० रुपये

• २४-३० किमी: ५० रुपये

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com