शिंदे टायगरला भेटले 'राम'ला का नाही? प्रदिप पूर्णेकरांच्या मुलाचा शिंदेंना थेट सवाल

Sanjay Raut Questions Eknath Shinde Over Tiger Shroff Visit: उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनी हल्ल्यानंतर टायगर श्रॉफची मध्यरात्री भेट घेतली...मात्र याचं भेटीनंतर पूर्णेकर प्रकरणावरून विरोधकांनी शिंदेंना कसं डिवचलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Why Did Eknath Shinde Meet Tiger Shroff but Not Ram Purnekar?
Why Did Eknath Shinde Meet Tiger Shroff but Not Ram Purnekar?saam tv
Published On: 

रविवारी संध्याकाळी अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला, आणि अवघ्या चारच तासांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट त्याच्या घऱी भेटीसाठी दाखल झाले. पण एका अभिनेत्याची हल्ल्यानंतर घेतलेली ही भेट आता शिंदेंच्या पथ्यावर पडण्याऐवजी त्यांच्याभोवतीच राजकीय चक्रव्यूह रचून गेलीये. याला कारण ठरलंय ते ठाण्यातील गाजलेलं प्रदीप पुर्णेकर हत्याकांड. एका सेलिब्रिटीसाठी धावून जाणारे सत्ताधारी राजकीय कार्यकर्त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष कसे करू शकतात? असा सवाल आता ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि पुर्णेकरांच्या मुलानं उपस्थित केलाय.

अवघ्या काही दिवसांपूर्वी, शिंदेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मानपाड्यात प्रदीप पुर्णेकरांची दिवसाढवळ्या हत्या झाली. अगदी टायगर श्रॉफवर गोळ्या झाडल्या अगदी त्याच स्टाईलनं, संध्याकाळच्या सुमारास बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी पुर्णेकरांवर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. आणि या हल्याप्रकरणी पुर्णेकरांच्या कुटुंबियांनी थेट शिंदेसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंवर हत्येचा गंभीर आरोप केला. या हत्याकांडानंतर उद्धव ठाकरेंपासून ते गणेश नाईकांपर्यंत सगळेच नेते पुर्णेकरांच्या घरी सांत्वनासाठी पोहोचले... पण शिंदेंनी मात्र पुर्णेकर कुटुंबियांची भेट टाळली.

नुकतीच प्रताप सरनाईकांनी पुर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी पुर्णेकर कुटुंबियांचे एकनाथ शिंदेंशी फोनवर बोलणं ही करुन दिलं होतं. शिंदेसेनेच्या माजी महापौरांवरच हत्येचा आरोप असल्यानं शिंदेंनी पुर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट टाळली का असाही प्रश्नये. पण याआधीही सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री असतांनाही शिंदेंनी गोळीबाराच्या अवघ्या ४८ तासांच्या आता सलमानच्या घरी जाऊन त्याचीही भेट घेतली होती.

पण आता पुर्णेकरांच्या हत्येची घटना ताजी असतांना त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याऐवजी शिंदेंनी गोळीबारात जखमी झालेल्या प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफची अवध्या काही तासातच भेट घेतल्यानं विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. आता शिंदे पुर्णकरांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या चर्चांना पुर्णविराम देतात की आता सांत्वन भेटीवरुनही राजकारण होतं हे पाहणं महत्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com