Eknath Shinde: ...युबीटी को पता चला कौन है असली शेर, खरी शिवसेना कुणाची हे जनेतेने दाखवून दिलं; विजयानंतर शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत विजय झाल्यानंतर टीका करणाऱ्या विरोधकांवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
Eknath Shinde: ...युबीटी को पता चला कौन है असली शेर, खरी शिवसेना कुणाची हे जनेतेने दाखवून दिलं; विजयानंतर शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
eknath shinde On uddhav thackerayx
Published On

Summary -

  • नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

  • २८८ पैकी २०७ जागांवर महायुतीने मारली बाजी

  • कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिंदेंकडून ठाकरेंवर निशाणा

  • एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना शायरीतून टोला

  • 'खरी शिवसेना कुणाची हे जनतेने दाखवले', असे विधान एकनाथ शिंदेंनी केले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकालात महायुतीने बाजी मारली. महायुतीने राज्यात घवघवीत यश मिळवले. २८८ पैकी २०७ जागांवर महायुतीने विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला फक्त ४४ जागांवर यश मिळाले. या विजयानंतर आता राज्यभर महायुतीकडून जल्लोष केला जात आहे. पण विरोधकांनी महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या विजयानंतर आता उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'नकली को आज किया ढेर, युबीटी को पता चला कौन है असली शेर', या शायरीचा माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायरीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. त्यांच्या शायरीने संपूर्ण सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला. 'नकली को आज किया ढेर, युबीटी को पता चला कौन है असली शेर, येतो अभी टेलर है, पिक्चर बाकी है', अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्याचसोबत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेवर टीका केली.

Eknath Shinde: ...युबीटी को पता चला कौन है असली शेर, खरी शिवसेना कुणाची हे जनेतेने दाखवून दिलं; विजयानंतर शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
Suhas Kande Politics: नांदगावमध्ये शिंदेंचे आमदार सुहास कांदेंनी गड राखला; राष्ट्रवादीचा धुव्वा तर भाजपचा सुपडा साफ

'आपल्याला नकली सेना म्हणणाऱ्यांची आजच आठावरच गाठ पडल्याचे सांगत, खरी शिवसेना कुणाची आहे हे जनतेने दाखवून दिल्याचा दावा त्यांनी केला. येणाऱ्या काळात आणखी मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळेल.', असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेना अधिक मजबूत होत असून, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये विजय निश्चित असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Eknath Shinde: ...युबीटी को पता चला कौन है असली शेर, खरी शिवसेना कुणाची हे जनेतेने दाखवून दिलं; विजयानंतर शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com