Political News : शिवसेना आमदाराच्या मुलाची रवानगी पोलीस कोठडीत; पाहा कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharashtra Political News : पालघर रुग्णालय हल्ला प्रकरणात शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावितला मिरा रोडवरून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsAI Image
Published On
Summary
  • पालघर रुग्णालय हल्ला प्रकरणात आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावितला अटक

  • मीरारोडवरून घेतलं ताब्यात

  • न्यायालयाने रोहित गावितला १६ सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

  • रोहित गावितच्या अटकेनंतर प्रकरणातील आरोपींची संख्या १७ वरून २२

पालघरमध्ये रुग्णालयात झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मिरा रोड येथून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्याला पालघर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रोहित गावितला १६ सप्टेंबरपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या १७ वरून २२ झाली आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.

दहीहंडी उत्सवानिमित्ताने ५ सप्टेंबर रोजी अनेक गोविंदा पथकाने उंच मनोरे रचले. यादरम्यान अनेक गोविंदा जखमी झाले. या जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पालघरमध्ये देखील रिलीफ हॉस्पिटलमध्ये जखमी गोविंदांवर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना खर्चावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन गोंधळ घातल्याचा आणि रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.

Maharashtra Political News
Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

या प्रकरणाच्या तपासात झालेल्या विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. आरोपींना अटक करण्यास होत असलेल्या दिरंगाईवर न्यायालयाने पोलिसांना खडसावले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली. याच तपासादरम्यान रोहित गावितला मिरा रोड येथून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात या प्रकरणावर जवळपास तासभर युक्तिवाद झाला. रोहित गावितच्या वकिलांनी तो घटनास्थळी उपस्थित होता, मात्र मारहाणीच्या घटनेत त्याचा कोणताही सहभाग नव्हता, असा दावा केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रभारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. सी. सालकर यांनी रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Maharashtra Political News
NCMC Card चा रिचार्ज संपलाय? २ मिनिटात घरबसल्या ऑनलाईन रिचार्ज करण्यासाठी 'या' ६ स्टेप्स करा फॉलो

दरम्यान, एफआयआरमध्ये सुरुवातीला १७ आरोपींची नावे होती. यामध्ये सात जणांची ओळख पटलेली, तर दहा जण अज्ञात होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी पालघर शिवसेना शहरप्रमुख राहुल घरात याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्याची पोलीस कोठडी १३ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी आणखी १२ गोविंदांना अटक केली असून, त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे, निलंबित पदाधिकारी सैराज पाटील, राहुल सांखले आणि मनीष ऊर्फ विकी सांखले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांना यापूर्वीच न्यायालयाने नकार दिला आहे. कुंदन सांखले, शुभम बांदिवडेकर आणि नगरसेविका नीलम सांखले यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले असून, त्यावर १५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com