Eknath Shinde: शिंदे गटाचा मास्टर प्लॅन तयार; 'या' आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी

सरकार स्थापन होऊन २५ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde GroupSaam TV
Published On

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन २५ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तर दुसरीकडे आता थोड्याच दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन तयार असल्याची माहिती मिळत आहे. (Eknath SHinde Latest News)

chief minister Eknath Shinde Group
Shivsainik : ठाकरेंच्या शिवसैनिकावर खूनी हल्ला; शिंदे गटाच्या सहा जणांवर गुन्हा दाखल, तिघे ताब्यात

मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मिळणार मंत्रीपद मिळणार. यासाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन तयार झाला असल्याचे बोलले जात आहे. पहिला वरिष्ठ आमदार, त्यानंतर रिजनल वाईज मंत्रिपद मिळणार आहेत. तर ऑपरेशन मधील आमदारांचे योगदान पाहिले जाणार आहे. यानंतर आमदारांची कार्यपद्धती या मोजणीवर मंत्रीपदाचे वितरण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

वरिष्ठ आमदारांना प्राधान्य देण्याची मागणी शिंदे (Eknath Shinde)गटातील आमदारांनी केली आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील कोणत्या आमदारांना कोणती मंत्रिपद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिंदे गटात पाच पेक्षा अधिक विद्यमान मंत्री होते, त्यामुळे या नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे. पण खाते कोणते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

chief minister Eknath Shinde Group
मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी? दररोज होतेय नेतृत्वाला विचारणा

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी?

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार आणि भाजप एकत्र येत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर मंत्रिमंडळाचा विस्तार अजुनही झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरल्याची माहिती मिळात आहे. (Eknath Shinde Latest News)

मंत्रिमंडळाचा मुहूर्त लांबल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरल्याची माहिती मिळत आहे. ईच्छुक आमदारांच्या मतदारसंघात नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यांचा शपथविधी झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अस सांगण्यात आले होते, पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. मतदारसंघात नाराजी पसरल्याची माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आमदार देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com