Mahrashtra Political Crisis : "संजय राऊत यांनी हाताच्या बाह्या सावरून मोठ्यांनी बोलणं बंद करावं, तुमच्या बोलण्याची पद्धत महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. मी त्यांना शिंदे साहेबांचा एक सैनिक म्हणून सांगतोय की त्यांनी आपलं तोंड आवरावं, तुम्ही आताच साडेतीन महिन्यांचा आराम करून आलात, तुम्हाला परत आराम करण्याची वेळ येऊ नये", असं म्हणत शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई यांनी संजय राऊतांना चांगलंच खडसावलं आहे. ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics News)
सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. असं असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर (Eknath Shinde) निशाणा साधला होता. 'कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. तुम्ही तर स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? मग दाखवा ना आता कर्नाटकाला भाईगिरी, कसले भाई तुम्ही', असं म्हणत संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज केलं होतं.
इतकंच नाही तर, 'तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, महाराष्ट्राने गेल्या ५५ वर्षांत इतके हतबल मुख्यमंत्री, इतकं लाचार सरकार पाहिलेलं नाही. काल दोन मंत्र्यांनी (चंद्रकांत पाटील, शंभुराजे देसाई) शेपूट घातलं. ते बेळगावमध्ये जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार', अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. (Latest Marathi News)
दरम्यान, संजय राऊतांच्या या टीकेचा शंभुराजे देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे.
पुढे बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले की, 'संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करुन तुरुंगाबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.