उद्योगांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंची रॅपिड अ‍ॅक्शन! आधुनिक पद्धतीने चाकणचे खड्डे बुजवायला सुरूवात

Eknath Shinde Launches Modern Technology Pothole: चाकण औद्योगिक परिसरातील खड्डे बुजवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅपिड अॅक्शन. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच, एम-60 काँक्रीट आणि प्रिकास्ट पॅनेलसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू
EKNATH SHINDE’S RAPID ACTION
EKNATH SHINDE’S RAPID ACTIONsaam tv
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुणे: चाकण औद्योगिक क्षेत्रात रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे तेथील कंपन्यांनी थेट स्थलांतराचा इशारा दिल्याने सरकारने तात्काळ त्याची दखल घेत कामाला सुरुवात केली. आठवडाभराच्या आतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे बुजविण्यासाठी एक टीम चकणाला पाठवली. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्याने खड्डे बुजविण्यास सुरुवात देखील केली. या सगळ्याची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे हे चाकण गेले असून त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत देखील होते. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पारंपरिक डांबराऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच, एम-60 काँक्रीट विथ हार्डनर आणि प्रिकास्ट पॅनेल या प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्डे बुजवले जात आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या 30 ते 45 मिनिटांत संबंधित रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे.

EKNATH SHINDE’S RAPID ACTION
चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय; कंत्राटदारांनाही दिला इशारा

जिल्हाधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती

चाकण परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामात विविध विभागांचा समन्वय राहावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. MIDC, PMRDA, PWD आणि MSSIDC या विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या समितीकडे असेल. यासंदर्भातील जीआरही जारी करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सरकार केवळ खड्डे बुजवून प्रश्न सोडवणार नसून चाकण परिसरातील 300 ते 400 किलोमीटर रस्त्यांसाठी कायमस्वरूपी एकात्मिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि पथदिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

EKNATH SHINDE’S RAPID ACTION
खड्ड्यांमुळे चाकणमधील उद्योग जाणार, 4 हजार कुटुंब रस्त्यावर येणार

चाकण हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक परिसर असून येथील उद्योगांना आवश्यक त्या मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. उद्योग बाहेर जाऊ नयेत आणि स्थानिक तरुणांचा रोजगार टिकून राहावा, यासाठी सरकारने तातडीचा पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. चाकणमधील रस्त्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन आणि विविध विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

EKNATH SHINDE’S RAPID ACTION
2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

तर चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूककोंडी, पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर आता सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली आहे. बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत. चाकणमधील पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं आणि प्रलंबित प्रश्नांचा बैठकीत आढावा घेतला जात आहे. त्यामुळे या बैठकीत चाकणसाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com