मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसामुळे राजकीय नेत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. शेवटच्या क्षणीही मतदारांसमोर पोहोचण्याचा राजकीय पक्षाचा कल होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. '२०१९ साली शिवसेना-भाजप एकत्र लढले. मोदी-बाळासाहेबांचे फोटो लावले. लोकांनी भरभरून मते दिली. आमच्याशिवाय सरकार बनत नाही, त्या दिवशी त्यांनी स्टेटमेंट केले की आमच्यासाठी सर्व दरवाजे मोकळे आहेत. म्हणजे तुमचं ठरलं होतं. त्यांनी आघाडी केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलाा. मग आता खरे गद्दार कोण? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
'राहुल गांधी यांनी एक तिजोरी आणली. मला वाटलं की महाराष्ट्राला काही देतील. खटाखट देणार बोलले होते. पण तिजोरी घेऊन आले. महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालण्यासाठी आले. राहुल गांधींकडून ही अपेक्षा नव्हती. २ लाख लोकांना घरे मिळतील. त्यांचं आयुष्य बदलेल. त्यांची अवस्था खूप वाईट आहे. त्यांना न्याय देण्यासाठी राहुल गांधींनी व्यवस्थित माहिती घ्यावी लागेल. आधी मॅच फिक्सिंग होती. सरकार गेल्यानंतर बदलले, असे शिंदे पुढे म्हणाले.
'आशियाचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. धारावीच्या लोकांना आवाहन करतो. राजकीय लोकांना बाजूला ठेवा. तुमचा फायदा काय आहे तो बघा. धारावीचं सत्य जाणून घ्या. गरीब जनता आहे. तुम्हाला आशीर्वाद मिळतील, असं आवाहन मी राहुल यांना पुन्हा एकदा करतो. ते बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट बोलतात का? त्यांची पण जीभ कचरतेय. तोडो-फोडो काही करा. मला जेलमध्ये टाका. मी काय ऐरागैरा नाही. एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं. शिंदेंनी तुम्हाला इतकं टाइट केलं की खुर्चीच गायब झाली, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
'निवडणुकीदरम्यान बॅगा चेकिंग करतात. ते रुटिन आहे. माझी पण बॅग चेक केली. मुख्यमंत्री राहिलेला माणूस व्हिडिओ, फोटो काढतो. विचारतात, माझे कपडे आहेत. युरिन पॉट पण आहे. त्या बॅगमध्ये काही नाही. जाणाऱ्या -येणाऱ्यांना तपासा. त्यांना कंटेनर लागतात. बॅगा नाही, असं म्हणत शिंदेंनी तोफ डागली.
'एकनाथ शिंदे हा काम करणारा कार्यकर्ता आहे. मला समाधान आहे की, दोन सव्वादोन वर्षात एवढं काम केलं आहे. विकास, योजनांमुळे समाधानी आहे. याच जोरावर मी लोकांसमोर जात आहे. आमच्यामध्ये काहीही नाही. शर्यत नाही. गल्लीबोळात शर्यत आहे. त्यांचा चेहरा आघाडीलाच चालला नाही, तर राज्याला कसा चालेल? असा सवाल करत शिंदेंनी निशाणा साधला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.