सुनील काळे, मुंबई
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयागोच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. अजित पवार गटाच्या बाजूने निकाल लागल्याने त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्विकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही काल ही कटीबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू हा विश्वास जनतेला देतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.