NCP Party and Symbol: शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे; निवडणूक आयोगाचा निर्णय

Sharad Pawar vs Ajit Pawar: राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीतील संघर्षावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit PawarSaam TV
Published On

Maharashtra Politics Breaking News :

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीतील संघर्षावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

यानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचेच असल्याची मोठी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar vs Ajit Pawar
White Paper: यूपीए सरकारच्या आर्थिक गैरकारभारावर मोदी सरकार आणणार ‘श्वेतपत्रिका’, संसदेचे अधिवेशनही एक दिवस वाढवले

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही (NCP Cisis) २ जुलै २०२३ ला उभी फुट पडली होती. अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात दोन गट पडले. ज्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला. याचबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होती. ज्याचा निकाल आज लागला आहे. ज्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिला आहे.  (Latest Marathi News)

''या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार''

निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे.''

Sharad Pawar vs Ajit Pawar
Paper Leak Bill: 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 कोटी दंड; पेपरफुटीविरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर; वाचा सविस्तर

जयंत पाटील म्हणाले, ''या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.''

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अजित पवार गटाकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com