Dry Day News: तळीरामांसाठी आनंदाची बातमी!लोकसभेचा निकाल लागताच सुरू होणार दारू विक्री
Dry Day News Mumbai High Court

Dry Day News: तळीरामांसाठी आनंदाची बातमी! लोकसभेचा निकाल लागताच सुरू होणार दारू विक्री

Dry Day News Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाने तळीराम आणि दारू विक्रेत्यांना एक दिलासा दिलाय. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच दारूची दुकाने सुरू करता येतील, असा निर्णय दिलाय.
Published on

सचिन गाड, साम प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमधील ड्राय डेसंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. ही बातमी वाचून तळीरामांचा आनंद गगनात मावणार नाही.लोकसभेचा निकाल लागताच मुंबईत दारू विक्री सुरू केली जाणार, आहार संघटनेच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी २० मे रोजी मुंबई शहर आणि उपनगरात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ४ जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदीचा आदेश जारी केला होता. या आचार संहितेच्या काळात दारू विक्री बंद होती. मतदान झाल्यानंतर तळीरामांनी दारुच्या दुकानांवर मोठी गर्दी केली होती. पण निकालाच्या दिवशी ड्राय डे ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आहार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेत दारू विक्रेत्यांना दिलासा. तसेच या निर्णयाने तळीरामांनाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक निकालाचा ४ जून हा संपूर्ण दिवस हा ड्राय डे असेल, असा घोषित केलं होतं. यानंतर आहार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाबाबत याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आहार संघटनेला दिलासा दिला असून हॉटेल, चालक आणि बार चालकांना दुकाने सुरू ठेवण्यात मुभा दिलीय. जर निकालाचा संपूर्ण दिवस ड्राय डे ठेवला तर आमचे आर्थिक नुकसान होईल, असा दावा दारू विक्रेत्यांनी केला होता.

Dry Day News: तळीरामांसाठी आनंदाची बातमी!लोकसभेचा निकाल लागताच सुरू होणार दारू विक्री
Maharashtra Politics 2024 : शिंदेंचं 'कल्याण', भाजपला चिंता?; भाजपच्या गडात शिंदेंचा वरचष्मा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com