Drought Discussed in Cabinet Meeting: राज्यावर दुष्काळाचं सावट? कॅबिनेट बैठकीत पावसाच्या अंदाजावर सविस्तर चर्चा

Drought Discussed in Cabinet Meeting: जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Drought Discussed in Cabinet Meeting
Drought Discussed in Cabinet MeetingSaam TV
Published On: 

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध संस्थांनी या वर्षीच्या मान्सूनबाबत वर्तवलेल्या अंदाजावर चर्चा झाली आहे. विविध संस्थांनी यंदा मान्सून सरासरी कमी असण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट घोंघावत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आजच्या कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्रातल्या दुष्काळावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यंदाच्या मान्सूनबाबत विविध संस्थांच्या अहवालावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Latest News Update)

Drought Discussed in Cabinet Meeting
Cabinet Meeting Decisions: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; वाचा बैठकीतील 12 महत्त्वाचे निर्णय

नद्याचे गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात करा, असे आदेश राज्या सरकारने दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांवर एकामागोमाग संकंटं सुरु आहेत.दुष्काळ जर पडला तर काय काय उपाययोजना करायच्या यावर राज्य सरकार गंभीर असल्याचं दिसून येत आहे.

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावर्षी 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पावसाची शक्यता आहे. मागच्या वर्षी हवामान खात्याने 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण यावर्षी 96 टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.

Drought Discussed in Cabinet Meeting
Karnataka BJP Leader Killed: भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, कर्नाटकात निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं

स्कायमेटची अंदाज

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, देशात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊसमान राहणार आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात अल निनोमुळे चांगला पाऊस झाला होता. पण यावर्षी अल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.