Cabinet Meeting Decisions: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; वाचा बैठकीतील 12 महत्त्वाचे निर्णय

Cabinet Meeting Decisions: वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा दिला जाणार आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam TV

Cabinet Meeting Decisions: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दिवसा वीज नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कधीही उठून शेतात पाणी भरण्यासाठी जावं लागतं.

शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार आहे. वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा दिला जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू केलं जाणार आहे. ज्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू होणार आहे. (Latest News Update)

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय

>> राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू (सामान्य प्रशासन )

>> शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार. वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा (ऊर्जा विभाग)

Eknath Shinde
Karnataka BJP Leader Killed: भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, कर्नाटकात निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं

>> पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा (सहकार)

>> महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

>> राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी (उच्च व तंत्र शिक्षण)

>> आता बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना विद्यावेतन मिळणार (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

>> ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ (ग्राम विकास)

>> खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही (महिला व बालविकास)

Eknath Shinde
Heatwave Alert News: उष्णतेमुळे ब्लॅकआऊटचा धोका, जीवही जाऊ शकतो; हवामान विभागाचा नागरिकांन इशारा

>> पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता. (विधि व न्याय)

>> अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता‌. (विधि व न्याय)

>> पुणे पालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय (नगरविकास विभाग)

>> मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता (मराठी भाषा विभाग)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com