पोकळ आश्वासनं नकोत, प्रत्यक्ष मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

कोकणात आलेल्या पुराची मदत कोकणवासियांना अजून पर्यंत मदत मिळालेली नाही.
पोकळ आश्वासनं नकोत, प्रत्यक्ष मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
पोकळ आश्वासनं नकोत, प्रत्यक्ष मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारवर टीकाSaamTV
Published On

मुंबई : शेतकऱ्यांसह लहानातील लहान घटक असणाऱ्यांना राज्य सरकारने State Goverment पोकळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष आणि तातडीच्या मदत करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आपल्या ट्विटरद्वारे Twitter व्यक्त केले आहे. राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने मराठवाड्यात Heavy Rain in Marathwada प्रचंड नुकसान झाले असून जवळपास लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी तत्काळ मदत दिली पाहिजे असे मतं त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. (Don't make empty promises, help directly; Fadnavis criticizes MVA government)

अजून वादळाची मदत नाही

तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले असले आणि आपण मदतीची तात्काळ अपेक्षा करत असलो तरी कोकणात Kokan आलेल्या पुराची मदत कोकणवासियांना अजून पर्यंत मदत मिळाली नसल्याच फडणवीस यांनी निदर्शनास आणंल आहे. मराठवाड्यामध्ये पावसामुळे नुकसान झाल्याची जी माहिती राज्य सरकारने दिली आहे ती अतिशय धक्कादायक असून यंदाच्या पावसाळ्या मध्ये 436 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे या पुराची आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाची भीषणता लक्षात येत असून मोठ्या प्रमाणात शेतीचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी खूप कठीण परिस्थिती मध्ये अडकलेला आहे.

आधीच कोरोनामुळे Corona लहान घटकांना संकटाचा सामना करावा लागत असून त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नाही अशातच या आस्मानी संकटांमुळे शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत याची काळजी देखील सरकारने घ्यायला हवी असं देखील फडणवीसांनी नमूद केलं आहे. आपण सुचवलेल्या पर्यायांचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती देखील फडणवीस यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com