Dombivli News : श्वानाचं डोकं प्लास्टिकच्या बरणीत अडकलं; ३ तास जीवाची सुरु होती तडफड, बचाव पथक मदतीला धावलं

Dombivli latest news : डोंबिवलीच्या एमआयडीसी भागात श्वानाने पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बरणीत डोंक घातलं. मात्र, प्लास्टिकची बरणीत छोटी असल्याने त्याचं डोकं अडकलं.
श्वानाचं डोकं प्लॅस्टिकच्या बरणीत अडकलं; ३ तास जीवाची सुरु होती तडफड, बचाव पथक मदतीला धावलं
Dombivli NewsSaam tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढू लागला आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे या कडक उन्हात मुके प्राणी पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहे. अशाच वातावरणात श्वानाने पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बरणीत डोंक घातलं. त्यानंतर या प्लास्टिकच्या बरणीत त्याचं डोकं अडकलं. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला.

डोंबिवलीमधील एमआयडीसीमध्ये एक भटक्या श्वानाचं डोकं प्लास्टिकची बरणीत अडकलं. या श्वानाला तहान लागल्याने त्याने बरणीत डोकं घातलं होतं. त्यामुळे या श्वानाचा जीव मदतीसाठी विव्हळू लागला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. या स्थानिकांनी श्वानाची सुटका करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याची सुटका करु शकले नाही.

श्वानाचं डोकं प्लॅस्टिकच्या बरणीत अडकलं; ३ तास जीवाची सुरु होती तडफड, बचाव पथक मदतीला धावलं
Dombivli MIDC Blast | बॉयलरमध्ये स्फोट! स्थानिकांमध्ये घबराट, डोंंबिवलीमध्ये नेमकं घडलं काय?

स्थानिकांनी या घटनेची माहिती पॉज संस्थेच्या निलेश भणगे यांना दिली. पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी तत्काळ २० मिनिटात संस्थेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधत संस्थेची रुग्णवाहिका पाठवली. संस्थेचे महेश सांळुखे यांनी त्वरित धाव घेऊन श्वानाला पकडलं. त्यानंतर त्यांनी बरणी कापून मुक्या पाण्याचे प्राण वाचवले.

या घटनेनंतर नागरिकांनी प्लास्टिक वापरणे सोडून द्यावं आणि प्लास्टिक फेकणे बंद करावे, असं आवाहन संस्थेचे ट्रस्टी अनुराधा रामस्वामी यांनी केलं आहे.

श्वानाचं डोकं प्लॅस्टिकच्या बरणीत अडकलं; ३ तास जीवाची सुरु होती तडफड, बचाव पथक मदतीला धावलं
Dombivli MIDC Blast | डोंबिवली MIDCत भीषण स्फोट, स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण

पॉज संस्थेच्या भणगे यांनी सांगितलं की, 'लोकांनी तुमच्या सोसायटीच्या परिसरात पशू पक्ष्यांसाठी मातीचे किंवा सिमेंटचे पाणी भरलेले भांडे ठेवावे'. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी बदलापूर येथील गोरेपाडा देखी एका बिबट्याचे पिल्लू ३ दिवस जारमध्ये डोके अडकून फिरत होते. ३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला वाचविण्याचं यश पॉज आणि इतर संस्था आणि वनखात्याला आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com