Dombivli MIDC Blast | डोंबिवली MIDCत भीषण स्फोट, स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण

डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत ३५ ते ४० जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटानंतर कंपनीला आग लागली. काही क्षणांतच ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. स्फोटाची तीव्रता भयानक होती. आजूबाजूचा परिसर हादरून गेला. इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. कंपनीतील कामगार आणि परिसरातील नागरिकही यात जखमी झाले आहेत. हा आकडा जवळपास ३० ते ३५ आहे. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

स्फोटानंतर कंपनीला आग लागली. आग थोड्याच वेळात पसरली. या आगीनं आजूबाजूच्या तीन ते चार कंपन्यांनाही आपल्या कवेत घेतले. तर मागील बाजूस असलेल्या एका शोरूमपर्यंत ही आग पोहोचली. त्यात शोरूममधील काही कार जळून खाक झाल्या आहेत. तर आगीमुळं कंपनीत स्फोट सुरूच होते. त्यामुळे भीतीनं परिसरातील नागरिकांची पळापळ सुरू झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com