Viral Video : रखरखत्या उन्हात थंडावा मिळावा म्हणून कुत्रा थेट फ्रिजमध्ये जाऊन बसला; व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हहसाल

Dog in Fridge Video Viral : मुके प्राणी देखील आपल्याला विसावा मिळावा म्हणून काहीनाकाही अतरंगी जुगाड करत असतात. अशात सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

राज्यात सध्या तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. रखरखत्या उन्हापासून आणि गरमिपासून शांती मिळावी यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही जुगाड करत आहे. माणसांना आपल्या सोईनुसार ऋतूनुसार निवारा, अन्न, वस्त्र असे विविध बदल करता येतात. मुके प्राणी देखील आपल्याला विसावा मिळावा म्हणून काहीनाकाही अतरंगी जुगाड करत असतात. अशात सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video : भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर मॅडम कजरारे गाण्यावर थिरकल्या; नेटकरी म्हणतायत आम्हाला पण अशाच शिक्षिका पाहिजे होत्या

या श्वानाने गरम जास्त होत असल्याने त्यापासून वाचण्यासाठी एक जुगाड शोधलाय. घरामध्ये वावरत असताना फ्रीज उघडला की त्यातून थंड हवा येते हे पाहून श्वान थेट फ्रीजमध्ये जाऊन बसला आहे. या घरातील व्यक्तींनी श्वानाचा हा अतरंगी प्रकार आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्वान फ्रिजमध्ये आपण जिथे भांडी आणि भाजी ठेवतो त्यामध्ये जाऊन बसला आहे. शिवाय त्याने फ्रीजचा दरवाजा देखील बंद करून घेतलाय. आता घरामध्ये काही करण्यासाठी य घरातील महिला फ्रिज उघडते तेव्हा हे दृश्य पाहून ती चकित होते. हा श्वान घरामध्ये पाळलेला असावा असं व्हिडिओ पाहून समजत आहे.

श्वान फ्रिजमध्ये लपून बसला आहे असं महिला आपल्या घरातील इतर सदस्यांना सांगते. श्वानाने केलेली ही करामत पाहून सगळेच चकित होतात. त्यानंतर महिला श्वानाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो तिच्यावर भुंकतो आणि बाहेर येत नाही. किती प्रयत्न केले तरी श्वान काही बाहेर येण्यास तयार होत नाही. त्यानंतर ही महिला थेट त्याचे पाय पकडून त्याला फ्रिजमधून बाहेर काढते. मात्र नंतर तो पुन्हा फ्रिजमध्ये बसण्याचा हट्ट करतो.

मुक्या प्राण्यांना काही बोलता येत नाही. भाषेतून त्यांना व्यक्त होता येत नाही. मात्र त्यांना देखील मन असते. आपल्याप्रमाणे त्यांना देखील भावना असतात. श्वानाचा हा क्यूट व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सर्व व्यक्ती त्याने केलेल्या करामतीचं कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत.

Viral Video
सुषमा अंधारेंमुळे मनिषा कायंदेंपासून नीलम गोऱ्हेंपर्यंत सर्वांनी पक्ष सोडला : रुपाली चाकणकर, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com