पंढरीचे लागा वाटे! सखा भेटे विठ्ठल!! टाळ मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान

Dnyaneshwar Maharaj Palkhi Departure From Alandi: आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची विधीवत पूजा पार पडून टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान. ‘माऊली माऊली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
Devotees gather in large numbers in Alandi as Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi begins its sacred journey to Pandharpur.
Devotees gather in large numbers in Alandi as Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi begins its sacred journey to Pandharpur.saam tv
Published On

संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली, यावेळी त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहणी पवार, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

आळंदी येथील मंदिर परिसरात टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती वारकऱ्यांना अनुभवाला मिळत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Devotees gather in large numbers in Alandi as Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi begins its sacred journey to Pandharpur.
बँक हमीपत्रांवरील मुद्रांक शुल्कात मोठा बदल; उद्योगांना दुहेरी शुल्कातून दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

आळंदी परिसरात येणाऱ्या भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा, निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, महिला स्नानगृह, मोबाईल चार्जिंग चार्जिंग स्टेशन, चौकाचौकात पोलीसांचा कडेकोड बंदोबस्त, स्वच्छता पथक तैनात, भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण उद्घोषण यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com