PM Modi To Visit Maharashtra : मोदींचा दाैरा अन् भाजपात तू तू मैं मैं

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शिर्डीतील विविध विकास कामांचे लोकार्पण हाेणार आहेत.
sujay vikhe patil, ram shinde
sujay vikhe patil, ram shindesaam tv

- सुशील थोरात

Nagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर जिल्हा दौऱ्या आधीच भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (mp sujay vikhe patil) आणि विधान परिषदेवर गेलेले आमदार राम शिंदे (mlc ram shinde) यांच्यामध्ये चांगलेच वाकयुद्ध भडकले आहे. (Maharashtra News)

sujay vikhe patil, ram shinde
Leopard Enters In Amravati : बिबट्या आला रे..., अमरावतीकरांची उडाली घाबरगुंडी; वनविभाग घटनास्थळी दाखल

मागील आठवड्यात भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एकत्रित प्रवास करत मोहटा देवीचे दर्शन घेतले होते. त्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी टीका केली होती. या टीकेला आता पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

आम्ही महायुती आघाडी मधील आमदारांना बरोबर घेऊन एकत्रित प्रवास करतो मात्र खासदार सुजय विखे पाटील जेव्हा महाविकास आघाडी विरोधात होती तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) आमदारांना घेऊन फिरत होते. तेव्हा त्यांना युती धर्म दिसला नाही का असा सवाल करत आता आमच्यावर लक्ष ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे आमदार राम शिंदे यांनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

sujay vikhe patil, ram shinde
PM Modi To Visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र माेदी उद्या शिर्डीत, साईभक्तांसाठी महत्त्वाची सूचना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com