disha salian case : दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट! धडाकेबाज अधिकाऱ्याकडे तपासाची सूत्रे, कोण आहेत सीमा पाहुजा?

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर CBI ने FIR दाखल केली आहे. वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Disha Salian death case
Disha Salian death case Saam Tv News
Published On

Disha Salian death case CBI FIR latest update : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. आता या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास सीबीआयच्या वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सीमा पाहुजा या सीबीआयच्या दिल्ली मुख्यालयातील विशेष गुन्हे शाखेत (SC-II) पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत संवेदनशील गुन्ह्यांचा तपास करण्यात त्यांचा मोठा अनुभव आहे. तपासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २०२१ मध्ये सन्मानित करण्यात आले आहे

सीमा पाहुजा यांनी कोण कोणत्या प्रकरणाचा केला तपास?

तपास क्षेत्रातील उत्कृष्ट आणि बिनचूक कामगिरीबद्दल सीमा पाहुजा यांना २०२१ मध्ये गृहमंत्रालयाकडून सुवर्णपदकाने (Gold Medal) सन्मानित करण्यात आले आहे. हायप्रोफाईल गुन्ह्यांचा वैज्ञानिक व पुराव्यांवर आधारित तपास करण्यासाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत.

२०२४ मध्ये कोलकात्यातली आरजी कर मेडिकल कॉलेज प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येचा तपास त्यांनी केला होता. त्याशिवाय उत्तर प्रदेशातील २०२० हाथरस प्रकरणाचाही तपास त्यांच्याकडे होता. १९ वर्षीय दलित तरुणीवरील अत्याचार आणि मृत्यूची केस त्यांनी हाताळली होती. त्याशिवाय २०१७ उन्नाव बलात्कार प्रकरण आणि २०१७मधील कोठखाई 'गुडिया' प्रकरणाचा तपासही त्यांनीच केला होता. उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्याविरुद्धची केस, ज्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याशिवाय हिमाचल प्रदेशातील १६ वर्षांच्या शाळकरी मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा तपासही त्यांच्याच नेतृत्वत झाला होता.

Disha Salian death case
Manoj Jarange : उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मध्यरात्रीच्या सभेत जरांगे पाटलांचे मोठे विधान

एफआयआरमध्ये (FIR) काय आहे?

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सामूहिक बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एफआयआरमध्ये थेट कोणालाही आरोपी केलेले नसले तरी, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आणि खोटी माहिती पसरवणे या मुख्य मुद्द्यांवर अनेक बड्या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी केली जाऊ शकते. त्यामध्ये आदित्य ठाकरे,रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अभिनेते डिनो मोरिया, सूरज पांचोली, आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड्स आणि मालवणी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्याचा समावेश आहे.

Disha Salian death case
Crime : धक्कादायक! अज्ञात हल्लेखोरांनी नेत्याला संपवलं, राजकारणात खळबळ; परिसरात प्रचंड तणाव

एफआयआरमध्ये नेमका आरोप काय?

खटल्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, फायली आणि इतर सार्वजनिक नोंदी नष्ट करणे, लपवणे किंवा अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करणे.

गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी सार्वजनिक निधी, सरकारी मनुष्यबळ आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर करणे.

या प्रकरणात केवळ राजकीय नेते किंवा पोलीस अधिकारीच नाही, तर शवविच्छेदन (Post-Mortem) करणारे डॉक्टर, न्यायवैद्यक (Forensic) अधिकारी आणि घटनेच्या वेळचे इमारतीचे सुरक्षा रक्षक यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.

Disha Salian death case
Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

माझ्या मुलीची अस्मिता पणाला लावून ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा मिळावी - सतीश सालियान (दिशाचे वडील)

या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही, मी यावर कधी विचारही केला नाही. मी यावर का उत्तर देऊ? - आदित्य ठाकरे (आमदार)

हे प्रकरण आता सीबीआयकडे आहे. अशा वेळी आम्ही कोणत्याही तर्कवितर्कांना उत्तर देणे योग्य ठरणार नाही - देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

दिशा सालियान प्रकरणावर हायकोर्टाचे ताशेरे -

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सीबीआय तपासाचे आदेश दिले.१२ व्या मजल्यावरून खाली पडल्यानंतरही चेहऱ्याचे एकही हाड न मोडणे, घटनेच्या ठिकाणी रक्ताचे डाग न मिळणे आणि उशिरा झालेला पंचनामा यावर कोर्टाने बोट ठेवले. रात्री १ वाजता पोलीस फ्लॅटवर पोहोचल्याचे सीसीटीव्हीत दिसत असले तरी तपासाच्या नोंदीत त्याचा उल्लेख नाही. डिजिटल डिव्हाइस उशिरा जप्त करणे आणि नमुने गोळा करण्यात त्रुटी राहिल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com