Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची मानहानीची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ; पाहा काय घडलं

Satish Salian apology demand legal notice : दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Satish Salian apology demand legal notice
Satish Salian apology demand legal noticeSaam TV
Published On

Disha Salian father 500 crore defamation notice to Aaditya Thackeray: दिवंगत दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सतीश सालियन यांच्या या नोटीसमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोन बड्या नेत्यांना तब्बल ५०० कोटी रुपयांची कायदेशीर मानहानीची नोटीस पाठवली आहे. (Satish Salian Sends Rs 500 Crore Defamation Notice)

आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेला "आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी रचलेला राजकीय कट" असे जाहीर वक्तव्य केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी या नेत्यांवर केला आहे. या वक्तव्यांमुळे आपली आणि कुटुंबाची नाहक बदनामी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे आणि देशमुख यांनी वृत्तपत्रे, टीव्ही आणि सोशल मीडियावर बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणी

सतीश सालियन यांनी या नोटीसद्वारे केली आहे. पुढील ७ दिवसांत जाहीर माफी न मागितल्यास ५०० कोटी रुपयांच्या भरपाईचा दावा ठोकण्याचा इशारा सालियन यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो. मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. - आदित्य ठाकरे

सतीश सालियन यांनी कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, माध्यावर केलेले आरोप खोटे, निराधार, बेजबाबदार आणि बदनामीकारक आहेत. हे आरोप कोणत्याही विश्वासार्ह पुराव्याशिवाय, आधाराशिवाय आणि केवळ आपले छुपे हेतू साध्य करण्यासाठी करण्यात आले आहेत. हे आरोप माझे पक्षकार (सतीश सालियन) यांच्या सचोटी, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणावर थेट आणि गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com