मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरण CBI कडे; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात हायकोर्टात आज महत्वाची सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन प्रकरण CBI कडे; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Disha Salian death casesaam tv
Published On
  • दिशा सालियन मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

  • दिशा सालियन प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्याचे आदेश

  • दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास कोर्टाने सांगितले

  • दिशा सालियनच्या वडिलांच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय

Disha Salian Case: सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टात या प्रकरणी आज सुनावणी झाली असून कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला. हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच तपास केली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हायकोर्टाने या प्रकरणात बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दिशा सालियनच्या वडिलांनी यासंदर्भात याचिका दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

दिशा सालियनच्या संशयास्पद अवस्थेत झालेल्या मृत्यू प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. मुंबई हायकोर्टाने सीबीआयला सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश देणारा एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने सीबीआयला गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या या कठोर भूमिकेमुळे आता या जुन्या प्रकरणाच्या नव्याने, सर्वसमावेशक तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन प्रकरण CBI कडे; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट; हायकोर्टात काय घडलं?

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने हा निर्णय दिला. ज्यामध्ये त्यांनी २०२० मध्ये झालेल्या आपल्या मुलीच्या मृत्यूच्या कारणांविषयी आणि परिस्थितीविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. हायकोर्टाने सीबीआयला प्रथम सतीश सालियन यांचा जबाब अधिकृतपणे नोंदवण्याचे निर्देश दिले. तसेच, तपास यंत्रणेने तयार केलेल्या अंतिम अहवालावर किंवा निष्कर्षांवर समाधान न झाल्यास याचिकाकर्त्यांना कोर्टात त्याला आव्हान देण्याचे कायदेशीर स्वातंत्र्यही खंडपीठाने दिले. हा आदेश पीडितेच्या कुटुंबासाठी न्यायाच्या लढ्यात एक मोठा दिलासा मानला जात आहे. हायकोर्टाच्या या आदेशानंतर दिशा सालियनचे वडील भावुक झाले. त्यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले.

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन प्रकरण CBI कडे; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत; संशय असूनही गुन्हा का दाखल झाला नाही? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

दिशा सालियन मृत्यू प्रकरण ८ जून २०२० चे आहे. मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून संशयास्पद परिस्थितीत पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर लगेचच स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाला अपघात मानून अपघाती मृत्यूची नोंद करत प्राथमिक तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासानंतर ही आत्महत्या असल्याचे जाहीर करून प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण दिशाच्या वडिलांनी पोलिसांचा हा निर्णय फेटाळून लावला आणि एका घृणास्पद गुन्ह्यानंतर आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेतली.

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन प्रकरण CBI कडे; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com