MPSC Chairman: IPS रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी; कशी आहे कारकीर्द?

MPSC Chairman: राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
rajnish sheth
rajnish shethSaam Tv
Published On

Mumbai News:

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते. रजनीश सेठ यांची 2022 मध्ये राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती. (Latest Marathi News)

रजनीश सेठ यांच्याकडे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश सेठ यांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता रिक्त झालेल्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी आता कोणाची वर्णी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

rajnish sheth
GramPanchayat Election 2023: राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; जाणून घ्या मतदानाची अन् निकालाची तारीख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी याआधी किशोरराजे निंबाळकर होते. ते बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर रजनीश सेठ यांनी अर्ज केला होता. त्यानंतर आज शासनाकडून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

rajnish sheth
Sangli News: सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्या लढ्याला यश; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित!

रजनीश सेठ यांची कारकीर्द

रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रजनीश सेठ यांचा २९ डिसेंबर १९६३ रोजी जन्म झाला. ते २५ ऑगस्ट १९८८ ला पोलीस दलात भरती झाले. रजनीश सेठ यांचं शिक्षण हे बी ए ऑनर्स (एल एल बी) झालंय. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत.

गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपद म्हणून देखील काम केलं. त्यांच्याकडे २०२१ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

तर रजनीश सेठ यांची 2022 मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com