Sangli News: सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्या लढ्याला यश; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित!

Rohit Patil Sumantai Patil Hunger Strike: सावळज आणि इतर 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा, या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील उपोषणाला बसल्या होत्या
Sangli News
Sangli NewsSaamtv
Published On

Sangli News:

सांगलीमधून एक महत्वाची बातमी समोर आली असून आमदार रोहित पाटील आणि सुमनताई पाटील यांनी आपले अन्नत्याग उपोषण मागे घेतले आहे. सावळज आणि इतर 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा, या मागणीसाठी आमदार रोहित दादा पाटील आणि सुमनताई पाटील उपोषणाला बसल्या होत्या. अखेर सरकारने मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडले आहे.

Sangli News
Kopar Building Collapse: कोपरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; परिसरातील नागरिकांमध्ये घबराट

याबाबत अधिक माहिती अशी की, टेंभू योजनेतून तासगाव आणि कवठेमहांकाळमधील १९ गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी हे उपोषण केले होते.

त्यांच्या या उपोषणाची अनेक नेत्यांनी दखल घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला होता. अखेर त्यांच्या या लढ्याला अखेर यश आले असून राज्य राज्य सरकारने उपोषणाच्या पार्श्वभूमीवर टेंभूच्या विस्तारित योजनेसाठी ८ टीएमसी पाणी देण्यास मान्यता दिली आहे.

सरकारकडून पत्र आल्यानंतर रोहित पाटील (Rohit Patil) यांनी आपले उपोषण मागे घेतले. जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व आमदार अनिल बाबर यांच्याहस्ते ज्यूस पिऊन सुमनताई व रोहित पाटील यांनी अन्न त्याग उपोषण सोडले.

दरम्यान, यानंतर रोहित पाटील यांनी उपोषणात सहभागी झालेल्यांचे आभार मानले. तसेच "स्वर्गीय आर. आर. आबा याचे स्वप्न होते या गावांना पाणी मिळाले पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही पाठ पुरावा करत गेलो असे सांगत याबाबत राज्य सरकारने मान्यता दिल्याचे सांगितले आहे.

तसेच या प्रक्रियेला 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. आपणास विनंती हे उपोषण माघे घ्यावे ही विनंती या पत्राद्वारे केली आहे. आम्ही 1 महिन्याचा कालावधी थांबू पण याच्या पेक्षा जास्त वेळ लागेल तर मंत्रालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Sangli News
Shooting In Mall: शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार, ३ जणांचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com