Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस दिल्लीत PM मोदी आणि अमित शहांना भेटणार, राजीनाम्याच्या इच्छेवर काय निर्णय घेणार?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळातील जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत PM मोदी आणि अमित शहांना भेटणार, राजीनाम्याच्या इच्छेवर काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : Saam tv

गणेश कावडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजप २८ खासदारांवरून ९ जागांवर आला. महायुतीला राज्यात ४८ जागांपैकी १७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस आज काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची मोठी पिछेहाट झाली. राज्यातील तीन केंद्रीय मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. या निवडवणुकीत महायुतीचे बालेकिल्ले ढासळले. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीडमध्येही पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत PM मोदी आणि अमित शहांना भेटणार, राजीनाम्याच्या इच्छेवर काय निर्णय घेणार?
Saamana Editorial: बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला, बाबागिरीचा मुखवटा जनतेनेच ओरबाडला; सामनातून ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , आशिष शेलार आणि इतर नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वरिष्ठांकडे मागणी केली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण वेळ पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत PM मोदी आणि अमित शहांना भेटणार, राजीनाम्याच्या इच्छेवर काय निर्णय घेणार?
Narendra Modi: लोकसभा निकालानंतर महायुतीची खलबतं; विधानसभेत चुका सुधारून एकत्रित काम करा, PM मोदींनी दिले निर्देश

देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनी राजीनामा देऊ नका, अशी विनंती केली. मात्र, फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांना भेटणार आहेत. या बैठकीत राजीनाम्याच्या इच्छेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत काय निर्णय घेईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांच्या पाठिशी ओबीसी समाज

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ओबीसी समाज पाठिशी उभा राहिला आहे. ओबीसी समाजाने सरकारमधून पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडू नका, अशी साद ओबीसी समाजाने घातली आहे. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी फडणवीसांच्या पाठिशी ओबीसी समाज असल्याचे जाहीर केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com