Special Report : फडणवीसांचा राजकीय बॉम्ब; मंत्रिपद सोडण्याची तयारी

Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी थेट उमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलीय. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेचं काम करण्याची भूमिका त्यांनी मांडलीय.
Special Report
Special Report Saam Digital
Published On

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी थेट उमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलीय. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेचं काम करण्याची भूमिका त्यांनी मांडलीय. मात्र त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठींना मान्य होणार का? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट..

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजप आणि महायुतीला कमी जागा मिळाल्या. याची अनेक कारणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मात्र य़ा अपयशाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी खुल्या पत्रकार परिषदेत मोठा राजकीय बॉम्ब टाकला. फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्रिपद सोडण्याचीच तयारी दाखवली. पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छ व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंगच त्यांनी यातून फुंकलंय.

लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाला सुरूवात झाल्याचं दिसतंय. त्याची सुरूवात भाजपमधून होताना दिसते. 2022 मध्ये शिंदेंच्या बंडामुळे मविआ सरकार पडलं. मात्र युती सरकारमध्ये फडणवीसांनी त्याहीवेळी कोणतही पद स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं. आता पुन्हा फडणवीसांनी याच शीर्ष नेतृत्वाला जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केलीये. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र फडणवसींना सरकारमध्ये राहण्याची विनंती केलीये.

Special Report
Special Report : साताऱ्यात 'ट्रम्पेट'मुळे 'तुतारी'चा घात; ट्रम्पेटमुळे फुललं राजेंचं 'कमळ'?

राज्यातील राजकारणातील बाहुबली नेतृत्व फडणवीस आहेत. अशात लोकसभेत राज्यातील भाजपची झालेली वाताहत आणि त्यातून फडणवीसांनी दिलेले राजीनाम्याचे संकेत यातून आगामी काळात भाजपत बरेच बदल संभावतात. भाजपातील अंतर्गत गटबाजीचा फटका लोकसभेत बसला का? फडणवीस केंद्रीय नेतृत्वाला यातून काय संकेत देतायत ? यासारखे असंख्य प्रश्न फडणवीसांच्या राजीनाम्याच्या बॉम्बनं उपस्थित केलेत. याची उत्तर येत्या काळात मिळतीलच मात्र त्यातून राज्यातली राजकीय समीकरणं बदलणार हे नक्की.

Special Report
Eknath Shinde : देशात येणार NDA चं सरकार; शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात किती मिळणार कॅबिनेट मंत्रिपदं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com