Eknath Shinde : देशात येणार NDA चं सरकार; शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात किती मिळणार कॅबिनेट मंत्रिपदं?

Union Cabinet Minister : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या १५ पैकी ७ जागा निवडून आल्या आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना एनडीएतील घटकपक्ष असल्यामुळे त्यांना दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Digital

लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं आहे. इंडिया आघाडीने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात एनडीएची केंद्रात सत्ता स्थापन होईल. पण त्याआधी मंत्रिपंद कोणाकोणाला मिळणार याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात शिंदेच्या शिवसेनेचाही समावेश आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या १५ पैकी ७ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेना एनडीएतील घटकपक्ष असल्यामुळे त्यांना दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तशा हालचालीही सुरू झाल्याची माहिती आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या दोन खासदारांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. प्रतापराव जाधवही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. प्रतापराव जाधव सीनियर नेते आहेत तर श्रीरंग बारणे यांनी तीन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

महायुतीचे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने उद्या सकाळी मुंबईकडे रवाना होणार आहेत. दुपारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी ते दोन दिवसांनी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी रवाना होणार आहेत. श्रीकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाबाबत साशंकता आहे.

Eknath Shinde
Dindori Lok Sabha : नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात 1,03,632 मतं घेणारे अपक्ष उमेदवार गायब? कुटुंबीय पोलिसात तक्रार देणार

२०१४ मध्ये शिवसेनेचे १८ खासदार होते. मात्र आता शिवसेनेत फूट पडली आहे. एनडीएसोबस असलेल्या शिवसेनेला केवळ ७ जागा मिळाल्या आहेत. १८ खासदार असताना शिवसेनेला जवळपास दोन कॅबिनटे मंंत्रिपदे मिळाली होती. मात्र यावळे एकनाथ शिंदेंना किती मंत्रिपदं मिळतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde
Raju Shetti News: 'माझं काय चुकलं! शेतकऱ्यांनो तुम्हीही...' लोकसभेतील पराभव राजू शेट्टींच्या जिव्हारी; भावनिक पोस्ट चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com